• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे विद्यालयात “चला जाणुया नदीला ” अभियान

by Ganesh Dhanawade
January 13, 2023
in Guhagar
89 1
0
Various competitions in Patpanhale School

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे जनजागृती फेरी काढताना विद्यार्थी

175
SHARES
500
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात १ जानेवारी ते १० जानेवारी २०२३ या कालावधीत “चला जाणुया नदीला ” या अभियानांतर्गत शाळा स्तरावर निबंध स्पर्धा, वकतृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व प्रभात (जनजागृती ) फेरी हे उपक्रम राबविण्यात आले होते. Various competitions in Patpanhale School

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “चला जाणुया नदीला ” अभियानांतर्गत शालेय स्तरावर नदीचे व पाण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांची घोषणांनी प्रभात (जनजागृती ) फेरी पाटपन्हाळे हायस्कूल व शृंगारतळी बाजारपेठ या परिसरामध्ये सादर करण्यात आली. तसेच इयत्ता १ली ते ५वी गट, इयत्ता ६ वी ते ८ वी गट व इयत्ता ९ वी ते १२ वी गटात, शालेय स्तरीय प्रभात (जनजागृती ) फेरी , निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.  हे कार्यक्रम मुख्याध्यापक श्री. एम.ए. थरकार यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले Various competitions in Patpanhale School

शालेयस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक- इयत्ता १ ली ते ५ वी या गटात – कु. कस्तुरी संतोष घाणेकर,  ५ वी, ६ वी ते ८ वी गटात – कु. मानसी संदीप पालकर, ७ वी, ९ वी ते १२ वी गटात – कु. जान्हवी प्रफुल्ल विचारे यांनी संपादन केला. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक इयत्ता ६ वी ते ८ वी गटात- कु. मृण्मयी दत्ताराम जाधव, ७ वी, इयत्ता ९ वी ते १२ वी गटात – कु.आर्या निलेश चाळके, 9 वी, यांनी संपादन केला. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक – इयत्ता ६ वी ते ८ वी गटात कु. श्रीया संतोष नागेश, ७ वी,  इयत्ता ९ वी ते १२ वी गटात – कु. हर्ष नागेश जानवळकर, ९ वी यांनी संपादन केला. Various competitions in Patpanhale School

“चला जाणुया नदीला ” या अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात शाळास्तरीय उपक्रम राबविण्याचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस. एस. चव्हाण व सहकारी शिक्षक यांनी केले होते. निबंध, वक्तृत्व,‌ चित्रकला या स्पर्धेतील सुयशस्वी विद्यार्थी व सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापक एम.ए. थरकार व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले. Various competitions in Patpanhale School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVarious competitions in Patpanhale Schoolगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.