आबलोली विरा संघाला उपविजेतेपद ; स्पर्धेत ३२ संघांचा सहभाग
गुहागर, ता. 13 : राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी आयोजित ना. गोपाळकृष्ण गोखले क्रिडानगरीत क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. कै मारूती बंधू आडाव स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत यजमान राजा हिंदुस्थानी कोतळूक संघाने विजेतेपद पटकावले. तर विरा आबलोली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. Cricket tournament at Kotaluk
गुहागर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या एक ग्रामपंचायत रत्नागिरी जिल्हा मर्यादित टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत ३२ संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या राजा हिंदुस्थानी कोतळूक संघाला रोख रक्कम ३३ हजार, आकर्षक चषक. उपविजेत्या विरा आबलोली संघाला रोख रक्कम २२ हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. मालिकावीर कोतळूक संघाचा साहिल मोहिते, फलंदाज अनू आरेकर, अंतिम सामना सामनावीर शुभम महाडीक, गोलंदाज विरा आबलोलीचा राजला चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत मास्टर अविनाश नरवण संघाच्या साहिल जाधव याने अर्धशतक तर विकेटची हॅट्रिक गुरूकृपा पालशेत संघाचा राजकिरण बोले यांनी घेतली. Cricket tournament at Kotaluk
स्पर्धेत पंच म्हणून कैलास पिलणकर, धामणस्कर, आशिष आरेकर, अनू आरेकर, रोशन महाडीक, ओंकार बागकर यांनी काम पाहिले. समालोचन दापोली येथील शिरसागर सर, सुभाष सावंत सर, यश मोहिते, साहिल मोहिते यांनी केले. गुणलेखन प्रकाश साळवी, ओंकार पारकर यांनी केले. Cricket tournament at Kotaluk
स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाला ओबीसी आघाडी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, झी २४ तासचे पत्रकार प्रणव पोळेकर, भाजपा ओबीसी आघाडी गुहागर संयोजक दिनेश बागकर, डॉ पराग पावरी, पंचायत समिती माजी सदस्य दिलिप बागकर, श्रीमती माधुरी आडाव, निलेश आडाव, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक, तालुका उपाध्यक्ष संदिप साळवी, प्रमुख मानकरी नंदकुमार नार्वेकर, कोतळूक सोसायटी चेअरमन पांडुरंग कावणकर, व्हा चेअरमन अनंत चव्हाण, नरेश बागकर, संचालक सोनू पाष्टे, गंगाराम बारगोडे, किसन बारगोडे, शिवसेना ठाकरे गट कोतळूक शाखाप्रमुख अजय बाधवटे, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष जगन्नाथ भोसले, समीर आरेकर, वैभव बागकर, गणेश बागकर, अनिल आरेकर, अमोल बेलवलकर, मंदार गुहागरकर आदींसह मंडळातील सर्व सदस्य, हितचिंतक उपस्थित होते. सूत्रसंचालन समीर ओक यांनी केले. Cricket tournament at Kotaluk