डॉ. विनय नातू , शृंगारतळीत प्रोलाईफ हॉस्पिटलचे उद्घाटन
गुहागर, ता. 11 : रुग्ण आणि वैद्य यांच नातं सुद्धा वर्षानुवर्ष टिकले पाहीजे. तरच या रुग्णसेवेतील चांगल्या गोष्टी आणि घटना पुढच्या काळात सांगता येतील. असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले. ते प्रोलाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनसमयी बोलत होते. गुहागर तालुक्यातील पहिल्या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक पराग सावंत देसाई यांनी केले. Inauguration of Prolife Hospital in Sringaratali
उदघाटन समारंभात बोलताना माजी आमदार डॉ. विनय नातू म्हणाले की, गुहागरमध्ये रुग्णालय नाही याची सर्वाधिक जाणिव कोविडच्या काळात झाली. 35 वर्षांपूर्वी तात्या व माईंच्या इच्छेचा मान राखून एम.एस. झालेल्या डॉ. विवेक नातूंनी घोणसरे येथे रुग्णालय उभे केले. त्यानंतर नव्या पीढीतील सर्जन गुहागर तालुक्यात येण्यासाठी 35 वर्षांचा काळ लोटला. वेळंब गावातील गाडगीळ आणि देवधर कुटुंबातील 2 डॉक्टरांनी जागतिक किर्ती मिळवली. त्यानंतर आज याच गावातील एक तरुण पुन्हा एकदा गुहागरवासीयांना रुग्णसेवा देण्यासाठी शृंगारतळीत रुग्णालय उभे करत आहे ही कौतुकाची बाब आहे. Inauguration of Prolife Hospital in Sringaratali
पराग सावंत देसाई म्हणाले की, बँक ऑफ इंडियातील माजी कारकीर्द गुहागर शाखेतूनच सुरु झाली. त्या काळात अनेकवेळा ग्राहकाची गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही काही मंडळींकडून रोखीने पैसे घेत होतो. त्यामध्ये एक नाव बाळुशेठ यांचे होते. आज याच क्षेत्राचा व्यवस्थापक झाल्यानंतर पुन्हा एकदा गुहागरमध्ये अत्याधुनिक रुग्णालयाची गरज पूर्ण करण्यासाठी आल्याचे समाधान मोठे आहे. आमच्या बाळुशेठ यांचा मुलगा वैद्यकिय क्षेत्रात उच्च विद्याविभुषित होवून पुन्हा गुहागरमध्ये आला. याचा आम्हालाही अभिमान आहे. डॉ. सौ. अश्विनी ओक यादेखील मोठ्या हॉस्पिटलमधील संधी सोडून ग्रामीण भागात रुग्णसेवा करण्यासाठी पतीला भरभक्कम साथ देत आहेत याचे विशेष कौतुक वाटते. भविष्यात स्वमालकीच्या जागेत भव्य असे रुग्णालय उभे करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य बँक ऑफ इंडिया करेल असे आश्र्वासनही त्यांनी यावेळी दिले. Inauguration of Prolife Hospital in Sringaratali
डॉ. सचिन ओक म्हणाले की, कितीही शिक्षण घेतले तरी गुहागरमध्येच सुसज्ज रुग्णालय उभे करायचे हे आधीपासूनच मी ठरवले होते. आज ते स्वप्न पूर्ण होत आहे. माझी पत्नी डॉ. सौ. अश्विनी नेत्रविशारद आहे. त्यामुळे या रुग्णालयात नेत्रचिकित्सेसंदर्भात सर्वांत अद्ययावत यंत्रप्रणाली आपण बसवली आहे. दुर्बिणीद्वारे होणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया आपण इथे करु शकतो. त्याचप्रमाणे अस्थिरोगांशी निगडीत शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटरची व्यवस्थाही आपण उभी केली आहे. इथे काढलेला एक्स रे क्षणार्धात जगातील कोणत्याही डॉक्टरला दाखवता यावा म्हणून डिजिटल एक्से रे मशीन व अद्ययावत सॉफ्टवेअर आपण इथे बसविले आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णासाठी पहिला दिड तास महत्त्वाचा असतो हे लक्षात घेवून दोन बेडचे आयसीयू युनिट व्हेंटीलेटर सुविधेसह आपण उभे केले आहे. या रुग्णालयात 24 तास रुग्णसेवेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आपल्या तालुक्यातील रुग्णांना कमीत कमी वेळात उत्तमोत्तम अगदी मुंबई पुण्यासारखी सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही या रुग्णालयद्वारे करणार आहोत. Inauguration of Prolife Hospital in Sringaratali
या उद्घाटन समारंभाला उद्योजक मोहन संसारे, शाळीग्राम खातू, राजन दळी, रघुशेठ ओक, शोएब मालाणी, सुरेंद्र मर्दा, अरुण परचुरे, बॅक ऑफ इंडियाचे माजी व्यवस्थापक यशवंत बर्वे, अरुण गांधी, डॉ. राजेंद्र पवार, डॉ. अनिकेत गोळे, डॉ. मंदार आठवले, अरुण ओक, लक्ष्मण शिगवण, शोएब मालाणी, माजी सरपंच संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. Inauguration of Prolife Hospital in Sringaratali