गुहागर, ता. 10 : तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा रानवी शाळेची शैक्षणिक सहल शिवसृष्टी, डेरवण व ITI college सावर्डे येथे काढण्यात आली. या सहलीमध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थ्यांचे पालकही सहभागी झाले होते. Parents also participate in Ranavi school trip

या सहलीमध्ये शिल्पकला, विविध मूर्ती प्रदर्शन पाहण्यात आले. सहयाद्री शिक्षण संस्थेचे फार्मसी कॉलेजचे गार्डन पाहण्यात आले. व त्याठिकाणी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर दहिवली येथील शरदचंद्रजी पवार बायोटेक्नॉलॉजी कॉलेज पाहिले. या बायोटेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्रातील विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. बेकरी प्रकल्प, फळापासून पदार्थ तयार करणे व वायनरी प्रकल्प, सेंद्रीय खते व बियाणे तसेच ऑरगॅनिक पद्धतीने तयार केलेले फळे ‘ व भाजीपाला ‘ इ. ची लागवड या विषयी माहीती मिळाली. तसेच इतर अनेक शैक्षणिक उपक्रमांविषयी माहीती जाणून घेतली. Parents also participate in Ranavi school trip

या शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थी शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमती. रोशनी बारगोडे, त्यासोबत इतर माता पालक संघाचे सदस्य शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. स्नेहा गमरे मॅडम व सहशिक्षक, श्री अण्णासाहेब शिंदे सर मुलांसोबत सहलीसाठी उपस्थित होते. पालक म्हणून अभिषेक गीजे, दिपेश सोलकर, राजेश चोगले, व महिला पालक श्रीमती.नमिता पंकज कुळे, पुर्वी पंकज कुळे उपस्थित होते. Parents also participate in Ranavi school trip

