• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विद्यार्थी व महिलांसाठी करीअर मार्गदर्शन केंद्र

by Mayuresh Patnakar
January 10, 2023
in Ratnagiri
128 1
0
Career Guidance Center at Chiplun
251
SHARES
718
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

स्व.सदानंद आरेकर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण

गुहागर, ता. 10 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण यांनी कोकणातील विद्यार्थी व महिलांसाठी विद्यार्थी करीअर मार्गदर्शन केंद्राव्दारे कौशल्य विकास आधारित विविध कोर्सेस सुरु केले आहेत. हे कोर्सेस करून युवकांना नोकराची संधी उपलब्ध करुन देत आहे.  तरी विद्यार्थी व महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा. Career Guidance Center at Chiplun

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

यामध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ऑफिस असिस्टंट, ऍडव्हान्स ब्युटीशीयन, ऍडव्हान्स टेलरिंग, बेसिक टेलरिंग, गेस्ट हाऊस केअर टेकर, कस्टमर केअर एक्सिक्युटीव्ह, फॅशन डिझाईन, मेहंदी प्रशिक्षण, केक मेकिंग ट्रेनिंग, सिक्युरिटी गार्ड ट्रेनिंग, ज्वेलरी मेकिंग इत्यादी कोर्स घेतले जाणार आहेत. तसेच या कोर्सचा कालावधी 1 महिना, 2 महिना, 3 महिना असा राहिल. Career Guidance Center at Chiplun

विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित कोर्स करून नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. तसेच  या कोर्सेसच्या फी मध्ये मोठ्या प्रमाणात सवलतही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यासह देशातील विविध हॉटेल, औद्योगिक कंपन्या, क्रूझ अश्या विविध क्षेत्राशी संलग्न असणाऱ्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर रोजगार निमिर्ती साठी महिला भगिनींसाठी देखील कौशल्य विकास आधारित काही प्रशिक्षण कोर्सेस आहेत. जेणेकरून त्या त्या कोर्सेस च्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी रोजगार निर्मिती करता येऊ शकते. अधिक माहितीसीठी संपर्क : 8483051399 / 8485851399, पत्ता : तहा हाइट्स, मुंबई-गोवा हायवे , चिपळूण शहर प्रांत ऑफिस शेजारी. Career Guidance Center at Chiplun

Tags: Career Guidance Center at ChiplunGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share100SendTweet63
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.