ग्रा. तळवली येथे केक, कुकीज मेकिंग, बेसिक मेकअप व हेअरस्टाईल प्रशिक्षण
गुहागर, ता. 10 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळीकडून (Regal College Shringartali) सामाजिक बांधिलकी जपत निर्मल ग्रामपंचायत तळवली येथे खास महिलांसाठी एकदिवसीय मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये केक, कुकीज मेकिंग, बेसिक मेकअप व हेअरस्टाईल तसेच कोकम आगळ पासून पेय बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विशेष उपक्रमांतर्गत रिगल कॉलेज शृंगारतळीकडून महिलांची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली व निर्मल ग्रामपंचायत तळवली आवारामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. Free training by Regal College
या कार्यक्रमामध्ये प्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी तळवली ग्रामपंचायत सरपंच सौ. मयुरी महेश शिगवण, सदस्या सौ. सविता शिंदे, सौ. पूर्वा पवार सौ. मानसी पोफळे, श्री. संतोष जोशी यांचे पुष्प देऊन स्वागत केले. रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांबद्दल माहिती दिली. Free training by Regal College

यानंतर हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी महिलांना आइस केक ओव्हनशिवाय कसा बनवायचा तसेच कुकीज कसे बनवायचे, कोकम आगळ पासून विविध पेय कशी बनवायची याबाबत प्रशिक्षण दिले. तसेच फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी महिलांना खास समारंभात करण्यात येणाऱ्या बेसिक मेकअप आणि विविध हेअरस्टाईलचे प्रशिक्षण दिले. Free training by Regal College

या कार्यशाळेमध्ये डीएमएलटीच्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून तळवली येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी तळवली गावातील महिला, विद्यार्थीनी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, रिगल कॉलेज शृंगारतळीचे विद्यार्थी व सहकारी शिक्षकवृंद उपस्थित होते. Free training by Regal College

