गुहागर, ता. 10 : तालुक्यातील वरवेली येथील कु. ऐश्वर्या अरुण विचारे हिची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन अॅग्रीकल्चर साठी निवड झाली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व कृषी विकास समिती, बारामती यांच्या माध्यमातून राज्यातील कृषीक्षेत्र संशोधन करू पाहणाऱ्या तरुणतरुणींना यासाठी निवडले जाते. ऐश्वर्याला देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते फेलोशिप सन्मानपूर्वक देण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जेष्ठ कृषीतज्ञ डॉ. सी. डी. मायी उपस्थित होते. Aishwarya’s selection for INSPIRE Fellowship
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन अँग्रीकल्चरसाठी निवड केलेल्या ऐश्वर्या विचारे हिला महाराष्ट्रातील जिज्ञासू, विषयातील रूची आणि परिणामकारक नेतृत्वगुण या निकषावर शेती क्षेत्रातील फेलोशीपसाठी तज्ञांच्या समितीद्वारे निवड करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात नाविन्य निर्माण करणाऱ्या तरुण-तरुणीनों फेलोशीप देण्यात येते. या फेलोशीप अंतर्गत ज्यांची निवड झाली त्यांना कृषी क्षेत्रातील आपल्या देशातील व परदेशातील तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन व प्रात्यक्षिक तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणार आहेत. Aishwarya’s selection for INSPIRE Fellowship

यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ व अभ्यासक त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. भविष्य काळात कृषीक्षेत्रात नेतृत्व तयार करणे हा फेलोशीपचा उद्देश आहे. फेलोशीपसाठी निवड झालेल्या कु. ऐश्वर्या विचारे ही कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून कृषी क्षेत्रात नक्कीच क्रांती करेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. Aishwarya’s selection for INSPIRE Fellowship

