• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पालशेत विद्यालयाचे यश

by Ganesh Dhanawade
January 9, 2023
in Guhagar
300 3
0
Palshet School Success in Scholarship Exam
590
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पालशेतकर विद्यालयातील तालुक्यात प्रथम तीन क्रमांक

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पालशेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अभूतपूर्व असे यश संपादन केले आहे. तालुक्यामध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवण्याचा बहुमान पालशेत विद्यालयाने मिळवला. Palshet School Success in Scholarship Exam

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

इयत्ता ५ वी साठी असणाऱ्यां पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापेकी १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कु.अस्मी प्रदीप पटेकर या विद्यार्थ्यांनीने जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. इयत्ता ८ वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर  ७ विद्यार्थी तालुक्याच्या यादीमध्ये चमकले. यश किशोर आग्रे, (तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात २४ वा ) कु. विव्हेना अरविंद पटेकर,(तालुक्यात द्वितीय व जिल्ह्यात ३५ वी ), शुभम प्रदीप रामाणे, (तालुक्यात तृतीय ), कु. निकिता मंगेश जोशी, श्रेयस सुशील तुपट, श्रेयस संतोष नागे व साहिल शैलेश सैतवडेकर या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या व तालुक्याच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले. Palshet School Success in Scholarship Exam

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ८ वी स्कॉलरशिप प्रमुख श्री. जी. डी. ढेंबरे, श्री. सी. एम. कोळेकर, श्री. आर. डी. लांबोर, तर ५ वी स्कॉलरशिप प्रमुख श्री. एम.एम. क्षीरसागर, श्री. एस.ए. बर्डे, श्री. एस.पी. हिवराळे, श्री. यु.एन. सावंत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. हे यश मिळवण्यामध्ये विद्यालयाचे पूर्व मुख्याध्यापक श्री. एम. जी. जोगळेकर, नूतन मुख्याध्यापक श्री. आर. डी. कदम, पर्यवेक्षिका सौ. ढेरे, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वर्ग यांची प्रेरणा होती. सर्व यशस्वी विद्यार्थ्यावर जनरल बॉडी सदस्य प्रशांत पालशेतकर, स्कूल कमिटी सदस्य पंकज बिर्जे, नरेंद्र नार्वेकर, पालक , ग्रामस्थ यांच्या वतीने कौतुकाचा वर्षाव होत आहे. Palshet School Success in Scholarship Exam

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPalshet School Success in Scholarship ExamUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share236SendTweet148
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.