गुहागर, ता. 09 : शहरातील युनिक किड्स प्री स्कूलमध्ये मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून स्पर्धेची शोभा वाढवली. Costume Contest at Unique Kids School
वेशभूषा स्पर्धेमध्ये ज्युनियर केजी वेद धनावडे याने छ. शिवाजी महाराज, ईशा खरे हिने परी, सारंग मोरे याने शेतकरी, रिधान पावसकर याने झेब्रा, ऋतुराज खरे याने मावळा, ओवी छेत्र हिने कोळी, आस्मि हेगडे हिने ससा, सिया कदम हिने परी, आरूष गोळे याने स्पायडर मॅन, अर्णव साळुंखे याने मासा, निधिष कनगुटकर याने व्यावसायिक वेशभूषा तर सिनियर केजी मध्ये श्रेया जाधव हिने मोर, राजवीर शिंदे याने डोरेमॉन, आयुष वाबळे याने जिराफ, स्वरा टेकले हिने वाघ, देवांश परभने याने हत्ती, रेयांश रमंडवाल याने सिंह, ओम झगडे याने कुत्रा तर विशिका गणवीर हिने कार्टून डग अशी वेशभूषा केली होती. Costume Contest at Unique Kids School

युनिक किड्स प्री या स्कूलमध्ये प्रत्येक सणानिमित्त विविध कार्यक्रम साजरे होत असतात. शिवाय मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात. पालकांनी आपल्या पाल्या जवळ कसे वागावे, त्यांना कोणत्या गोष्टींपासून दूर ठेवावे, अशा मौलिक विषयावर वक्त्याकडून मार्गदर्शनही केले जाते. वेशभूषा परिक्षणाचे काम शिक्षिका सौ. निधी लोखंडे व सौ. करुणा असगोलकर यांनी केले. Costume Contest at Unique Kids School


