अन्यथा 26 रोजी उपोषण; मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर यांचा इशारा
गुहागर, ता. 09 : तालुक्यातील मोडकाआगर पुल ते मोडकाआगर नाका दरम्यान त्वरित डांबरीकरण किंवा रस्ता दुरुस्ती न केल्यास 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूण कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबत उप विभागीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, उपविभाग चिपळूण कार्यालय यांना निवेदन दिले आहे. Repair of Modkaagar Naka to Bridge road

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरु असतानाच मोडकाआगर पूल ते मोडकाआगर नाका दरम्यान रस्त्याची खोदाई करून ठेवण्यात आली आहे. या दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना नाहक त्रास करावा लागत आहे. मोडकाआगर नाका ते मोडकाआगर पुल दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत करण्यात यावा. खड्डेमय रस्ता असल्याने याठिकाणी सतत छोटे छोटे अपघात तसेच दुचाकीस्वार घसरून दुखापत होण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे रस्ता सुस्थितीत होण्यासाठी मोडकाआगर पुल ते मोडकाआगर नाका दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण ठेकेदारांने त्वरीत करावे. Repair of Modkaagar Naka to Bridge road

जर या रस्त्याचे रुंदीकरण काम करायचे नव्हते तर ठेकेदाराने रस्ता खणून का ठेवला, असा सवाल करत जर रस्ता खणुन ठेवला मग या रस्त्याची डागडुजी करणे, त्या ठेकेदाराचे काम नाही का ? नागरीकाना कोणताही प्रकारचा नाहक त्रास होणार नाही याची काळजी संबंधित ठेकेदार घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेळोवेळी वरील सर्व बाबतीत तक्रार करून सुध्दा दखल घेतली जात नाही. त्यामुळे गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने २६ जानेवारी रोजी आपल्या राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूण कार्यालय समोर उपोषणाला बसण्याचा भूमिका घेतली आहे. याठिकाणी उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी आपण जबाबदार असाल, असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे. Repair of Modkaagar Naka to Bridge road
मोडकाआगर पुल ते मोडकाआगर नाका दरम्यान त्वरित डांबरीकरण किंवा रस्ता दुरुस्ती निवेदन देण्यासाठी गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, चिपळूण तालुका अध्यक्ष अभिनव भुरण, पप्पू साळवी उपस्थित होते. Repair of Modkaagar Naka to Bridge road
