• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रिगल कॉलेज सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

by Ganesh Dhanawade
January 7, 2023
in Guhagar
264 3
0
Savitribai Phule Jayanti at Regal College
519
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वक्तृत्व स्पर्धा व यशस्वी महिला वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

गुहागर, ता. 06 : नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असलेल्या रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धा व यशस्वी महिला वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Savitribai Phule Jayanti at Regal College

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

या कार्यक्रमामध्ये रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे व सहकाऱ्यांनी प्रथम दीपप्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक योगदान, महिला सशक्तीकरण आदी विषयांवर भाषण केले. यानंतर ‘यशस्वी महिला वेशभूषा’ स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींनी जिजाऊ, डॉ. आनंदीबाई जोशी, हिरकणी, ताराराणी, सावित्रीबाई फुले आदी यशस्वी महिला भूमिका साकार केल्या. Savitribai Phule Jayanti at Regal College

Savitribai Phule Jayanti at Regal College

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. निर्जला मोहिते, द्वितीय क्रमांक कु. गौरी घाणेकर व तृतीय क्रमांक सानिका कोळथरकर यांना मिळाला. तर ‘यशस्वी महिला वेशभूषा’ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. निर्जला मोहिते, द्वितीय क्रमांक कु. वेदिका वाडावे व तृतीय क्रमांक कु. अमिषा भोसले यांनी पटकावला. Savitribai Phule Jayanti at Regal College

Savitribai Phule Jayanti at Regal College

रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते. Savitribai Phule Jayanti at Regal College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSavitribai Phule Jayanti at Regal CollegeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share208SendTweet130
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.