• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनोज जोगळेकर यांना विज्ञान मित्र पुरस्कार

by Mayuresh Patnakar
January 7, 2023
in Guhagar
169 2
0
Science Friend Award to Joglekar

विज्ञान मित्र पुरस्काराने मनोज जोगळेकर यांना गौरविताना अंतराळ वीर आरती पाटील

332
SHARES
949
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका विज्ञान प्रदर्शनात मान्यवरांनी गौरविले

गुहागर, ता. 07: तालुकास्तरीय 50 वे विज्ञान प्रदर्शन डॉ. ए पी जे अब्दुल कलाम विज्ञान नगरी शृंगारि उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे औचित्य साधून पालशेतकर विद्यालयातील विज्ञान शिक्षक मनोज जोगळेकर यांना विज्ञानमित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. गेली दोन वर्षे ते रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. Science Friend Award to Joglekar

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

 मनोज जोगळेकर हे श्रीमती र.पां. पालशेतकर विद्यालय, पालशेत मध्ये कार्यरत असताना जिल्हा परिषद शिक्षण विभाग रत्नागिरी, पंचायत समिती शिक्षण विभाग गुहागर व गुहागर तालुका विज्ञान शिक्षक मंडळ मार्फत आयोजित विज्ञान रंजन स्पर्धा, विज्ञान मंडळ स्पर्धा परीक्षा, संगणक संबोध परीक्षा(CCE) NTS, NMMS कार्यशाळा, विज्ञान प्रदर्शनात सक्रिय सहभाग घेत असत.  तालुका, जिल्हा व राज्यापर्यंत विज्ञान उपकरणाची निवड, अखिल भारतीय विज्ञान मेळावा, वैज्ञानिक आकृती रेखाटन व विज्ञान व गणित विषयाचे रिसोर्स पर्सन  म्हणून त्यांचा सहभाग होता. Science Friend Award to Joglekar

हरित सेना अंतर्गत वृक्ष संवर्धन व लागवड प्रकल्प, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमात सक्रिय सहभाग होता.  लखनौ ला झालेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात ते विद्यार्थी सोबत सहभाग गेले होते. विज्ञान विषयांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लिखाण केले आहे.   विविध उपक्रमांद्वारे  विद्यार्थी व समाज यामध्ये विज्ञान विषयाची जाणीव व जागृती दृढ करण्यासाठी त्यांनी योगदान दिले. त्यांच्या या कामाची दखल घेत “विज्ञान मित्र” पुरस्काराने, अंतराळवीर आरती पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याबद्दल जोगळेकर सरांनी गुहागर तालुका विज्ञान मंडळ, युनिटेक कम्प्युटरचे श्री बोट सर, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले.  या सर्व उपक्रमांमध्ये कै अनंत अग्रे यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. Science Friend Award to Joglekar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarScience Friend Award to JoglekarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share133SendTweet83
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.