• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पत्रकार दिनी 40 दात्यांनी केले रक्तदान

by Mayuresh Patnakar
January 6, 2023
in Health
112 1
0
On press day, 40 donors donated blood

गुहागर : रक्तदान शिबिरात मान्यवरांसह सीआयएसएफचे रक्तदाते

219
SHARES
626
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका पत्रकार संघाचा उपक्रम

गुहागर, ता. 06 : नववर्षाची सुरवात कंपनीच्या आवारात रक्तदानासारख्या पवित्र कार्याने होत आहे. पत्रकार दिनाच्या निमित्ताने गुहागर तालुका पत्रकार संघाने ही संधी आरजीपीपीएलला उपलब्ध करुन दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असे प्रतिपादन आरजीपीपीएलचे जनरल मॅनेरज अग्रवाल यांनी केले. ते रक्तदान शिबिराच्या उद्‌घाटन समारंभात बोलत होते. On press day, 40 donors donated blood

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

एनटीपीसीचे आप्पासो परीट आणि त्यांची पत्नी माधुरी परिट या दोघांनी एकाचवेळी केलेले रक्तदान, 6 महिलांचा सहभाग आणि ओ निगेटीव्ह या दुर्मिळ रक्तगटाचे 2 रक्तदाते मिळणे हे या शिबिराचे वैशिष्ट्य ठरले. On press day, 40 donors donated blood

On press day, 40 donors donated blood
गुहागर : एकाच वेळी रक्तदान करताना परिट दांम्पत्य

गुहागर तालुका पत्रकार संघाने पत्रकार दिनानिमित्त आरजीपीपीएल निवासी वसाहतीमधील सेवा वेलनेस सेंटरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ, कोकण एलएनजी आणि आरजीपीपीएलचे कर्मचारी, अधिकारी व त्यांचे कुटुंबियांनी सहभाग घेतला. 40 दात्यांनी रक्तदान केले. इंडियन रेड क्रॉस सोसायटीने रक्तदान शिबिरासाठी मेहनत घेतली. या संस्थेचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. अनिल जोशी रक्तदान शिबिरात पूर्णवेळ उपस्थित होते. On press day, 40 donors donated blood

On press day, 40 donors donated blood
गुहागर : रक्तदाते दिनेश कुरुप यांना प्रमाणपत्र देवून गौरविताना डॉ. युवराज इंजे, सोबत पत्रकार आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी

रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन आरजीपीपीएलचे जनरल मॅनेजर संजय अग्रवाल यांनी केले. तत्पुर्वी मान्यवरांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सत्यवान घाडे यांनी दर्पणकार जांभेकर यांच्या कार्याची माहिती सांगितली . तर मयुरेश पाटणकर यांनी गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे केले जाणारे उपक्रम सांगितले. संजय अग्रवाल यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतानाच नव्या वर्षात रक्तदानासारखा पवित्र उपक्रम आरजीपीपीएलमध्ये होत असल्याचे सांगितले. On press day, 40 donors donated blood

यावेळी आरजीपीपीएलमधील अधिकारी दिनेश कुरुप, अंतर्यामी दास, सीआयएसएफचे असिस्टंट कमान्डंट सींग,  मुख्य वैद्यकिय अधिकारी युवराज इंजे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल जोशी, अधिकारी विवेक, शैजु, मॅथ्युज्‌, ज्युवेल हक, सेफ्टी मॅनेजर लिंडा मॅडम आणि अमित शर्मा, पत्रकार मनोज बावधनकर, सत्यवान घाडे, मयुरेश पाटणकर, संकेत गोयथळे, गणेश धनावडे, मंदार गोयथळे आदी उपस्थित होते. On press day, 40 donors donated blood

Tags: 40 donors donated bloodGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOn press dayUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share88SendTweet55
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.