• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोतळूक उदमेवाडी येथे क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

by Mayuresh Patnakar
January 6, 2023
in Sports
174 2
0
Cricket tournament at Kotaluk Udamewadi
343
SHARES
979
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित स्पर्धेमध्ये ३२ संघांचा सहभाग

गुहागर, ता. 06 : राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी वतीने टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कै मारूती बंधू आडाव स्मृती चषक (पर्व तिसरे) रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत मर्यादित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दि. 05 जानेवारी रोजी सरपंच सौ. प्रगती मोहिते फित सोडून तर प्रमुख मानकरी नंदकुमार नार्वेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. Cricket tournament at Kotaluk Udamewadi

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

गुहागर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये ३२ संघांनी सहभाग घेतला आहे. मंडळाच्या वतीने सलग २३ व्या वर्षी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख रक्कम ३३ हजार, उपविजेत्या संघास रोख रक्कम २२ हजार व आकर्षक चषक तसेच वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा समारोप रविवार दिनांक ८ जानेवारी रोजी होणार आहे. Cricket tournament at Kotaluk Udamewadi

Cricket tournament at Kotaluk Udamewadi

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सरपंच प्रगती मोहिते, उपसरपंच शितल गोरिवले, प्रमुख मानकरी नंदकुमार नार्वेकर, ना. गोपाळकृष्ण गोखले विदयालय कोतळूक मुख्याध्यापक बनसोडे सर, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन ओक, सचिन भेकरे, सुनिल आगिवले, कोतळूक सोसायटी संचालक सोनू पाष्टे, गोरिवलेवाडी अध्यक्ष यशवंत निवाते, गंगाराम बारगोडे, आबा आरेकर, मंडळाचे अध्यक्ष उल्हास आरेकर, किसन बारगोडे, उदमेवाडी अध्यक्ष समीर ओक, उपाध्यक्ष नरेश बागकर, गुहागर क्रिकेट असोसिएशनचे सचिव कैलास पिलणकर, समीर आरेकर, वैभव बागकर, गणेश बागकर, मंदार गुहागरकर, अमोल बेलवलकर, आशिष आरेकर, अनिल आरेकर, अनिकेत आरेकर, आदींसह मंडळाचे सर्व सदस्य, क्रिडा प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. Cricket tournament at Kotaluk Udamewadi

Cricket tournament at Kotaluk Udamewadi
Tags: CricketCricket tournament at Kotaluk UdamewadiGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share137SendTweet86
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.