गुहागर, ता. 06 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान व जनशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास प्रशिक्षणाचे (Skill Development Courses) आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 जानेवारी 2023 पासून श्रीसिध्दिविनायक विद्यामंदिर मुंढर या विद्यालयातील शिक्षक प्रबोधिनीमध्ये हे प्रशिक्षण वर्ग सुरू होत आहेत. Skill Development Training at Mundhar
स्कील डेव्हलपमेंट कोर्सेसमध्ये प्लंबर, इलेक्ट्रीकल टेक्निकल हेल्पर, असिस्टंट वेल्डर आणि फॅब्रिकेटर इत्यादी कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची प्रवेश फी SC/ST/दिव्यांग/आर्थिकदुष्ट्या मागास यांच्यासाठी रु. 10/- व खुला प्रवर्गासाठी रु. 460/- राहिल. याचा कालावधी 80 दिवसांचा असून रोज 3 तास प्रशिक्षण घेण्यात येईल. तसेच कुशल प्रशिक्षक, कौशल्य विकासाची सुवर्णसंधी, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे सर्टिफिकेट, नोकरी/व्यावसायिक कर्जासाठी उपयुक्त सरकारी सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. Skill Development Training at Mundhar

या कोर्सेसाठी मर्यादित प्रवेश उपलब्ध असून लवकरात लवकर नोंदणी करण्यात यावी. कौशल्य विकास प्रशिक्षण नोंदणीसाठी श्री. ए. एच. साठे – 8888265965 व श्री. डी.एस. बडद – 9689988809 यांचेकडे त्वरीत संपर्क साधावा. अशी विनंती डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान व जनशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेकडून करण्यात आली आहे. Skill Development Training at Mundhar

