गुहागर, ता. 06 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) मंगळवार दि.०३ जानेवारी २०२३ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेमिनार हॉल मध्ये महिला विकास कक्ष व इतिहास विभागातर्फे करण्यात आली. यावेळी वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या. Savitribai Phule Jayanti at KDB College
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण व जाणीव जागृती व्हावी. विद्यार्थ्याच्या अंगी सभाधीटपणा येण्याच्या अनुषंगाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र, सामाजिक कार्य व शैक्षणिक कार्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा याच वेळी संपन्न झाल्या. Savitribai Phule Jayanti at KDB College

यानंतर प्रमुख वक्ते प्रा.डॉ.प्रसाद भागवत यांनी सावित्रीबाईनी रूढी, परंपरा, शिक्षण इ.मध्ये नव्याने परिवर्तन घडवून आणल्यानेच त्यांना क्रांतिज्योती, ज्ञानज्योती या उपाध्या दिल्याचे स्पष्ट केले. तसेच ३ जानेवारी हा दिवस ‘ महिला मुक्तीदिन ‘, बालिकादिन म्हणून साजरा करीत माहिती दिली. सावित्रीबाईच्या कार्याची दखल इंग्लंड येथील सरकारने घेतली होती अशी पत्रे उपलब्ध असल्याचे विषद केले.अध्यक्षिय मनोगतमध्ये प्रभारी प्राचार्य प्रा.विराज महाजन यांनी तत्कालिन काळाच्या संदर्भातच त्या व्यक्तीचे विचार तपासून त्यांची चिकित्सा करून त्यामधील सम्यक विचार पुढे नेण्याचे आवाहन विद्यार्थ्याना केले. Savitribai Phule Jayanti at KDB College

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र, सामाजिक कार्य व शैक्षणिक कार्य या विषयावर संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक– कु.मृणाल पाटील, द्वितीय क्रमांक– कु.विधी विचारे, तृतीय क्रमांक– कु.सोहम खरे आणि उत्तेजनार्थ- कु.सौरभ जाधव व कु.साहिल गमरे यांना गुणानुक्रम देण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.सौ. रश्मी आडेकर व आभारप्रदर्शन प्रा.शीतल मालवणकर यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.आनंद कांबळे, प्रा.डॉ रामेश्वर सोळंके, शिक्षकेतर कर्मचारी आणि ८३विद्यार्थी उपस्थित होते. Savitribai Phule Jayanti at KDB College

