• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नाताळचा उत्सव श्रमदानातून साजरा

by Mayuresh Patnakar
January 3, 2023
in Guhagar
156 1
0
Cleanliness in Vivekanandalaya
306
SHARES
873
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वाडदईकरांची विवेकानंदालयात स्वच्छता

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील वाडदई येथील ग्रामस्थांनी साथ साथ चॅरीटेबल ट्रस्टच्या विवेकानंदालय ग्रामविकास प्रकल्पात स्वच्छता मोहिम राबवली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात एका सेवा प्रकल्पावर स्वच्छ भारत अभियान राबविण्याचा उपक्रम केल्याचे सुभाष कांबळे यांनी सांगितले. या अभियानात वाडदईमधील 52 ग्रामस्थ सहभागी झाले होते. Cleanliness in Vivekanandalaya

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

वाडदईतील सामाजिक काम करणारे विनायक कांबळे आणि सुभाष कांबळे यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात स्वच्छ भारत अभियानांतर्गत एक दिवस श्रमदानातून स्वच्छता करण्याचा उपक्रम वाडदईतील ग्रामस्थांना सांगितला. ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. त्यानंतर सुभाष कांबळे आणि विनायक कांबळे यांनी साथ साथ चॅरीटेबल ट्रस्टचे विश्र्वस्त शरद जोशी यांच्यासोबत उपक्रमाविषयी चर्चा केली. त्यावेळी शरद जोशी यांनी विवेकानंदालय या ग्रामविकास प्रकल्पाद्वारे पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याचबरोबर विवेकानंदालयच्या परिसरात विविध प्रकारची शेकडो झाडे लावून माळरानावर हिरवळ उभी करण्याचे कामही आपण करत आहोत. या प्रकल्पात येवून श्रमदान करावे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य आम्ही करु. असे सांगत वाडदईकरांना उपक्रम स्थानावर निमंत्रण दिले. Cleanliness in Vivekanandalaya

Cleanliness in Vivekanandalaya

दिवस ठरला. विवेकानंदालय ग्रामविकास प्रकल्पाचे कार्यकर्ते प्रकाश देवळे यांनी कामाचे नियोजन केले. त्याप्रमाणे  18 महिला, 22 पुरुष, 12 शाळकरी मुले असे 52 ग्रामस्थ प्रकल्पावर आले. 97 गुंठे परिसरातील वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या. पावसाळ्यात वाढलेले गवत काढणे, 125 झाडांना पाणी घालण्यासाठी अळ्या तयार करणे, कातळावरील कचवं (छोटी काटेरी झाडे) उपटणे, इतस्तत: पडलेला जांभा चिरा रचनेत लावणे, चिऱ्यांमध्ये साप, विंचू राहू नयेत  म्हणून फवारणी करणे. अशी कामे श्रमदानातून करण्यात आली. त्यानंतर परिसरातील राम मंदिरात सर्वांनी वनभोजनाचा आनंद लुटला. ही व्यवस्था साथ साथ चॅरीटेबल ट्रस्टद्वारे करण्यात आली होती. Cleanliness in Vivekanandalaya

Cleanliness in Vivekanandalaya

श्रमदानाचे वेळी वेळणेश्र्वर वाडदई ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच चैतन्य धोपावकर यांनीही काही काळ उपस्थित राहुन श्रमदानाचा आनंद लुटला. वाडदईकर नेहमीच आगळेवेगळे उपक्रम करतात. सदैव सहकार्यासाठी तयार असतात. असे सांगून त्यांनी वाडदईकरांचे कौतुक केले. Cleanliness in Vivekanandalaya

साथ साथ चॅरीटेबल ट्रस्टचे विश्र्वस्त शरद जोशी म्हणाले की, आपल्या परंपरेत नसलेला नाताळ आणि नववर्ष स्वागतोत्सव अन्यत्र कशा पध्दतीने साजरा केला जातो ते आपण पहातो. मात्र कोणत्याही उत्सवाला, सामुहिक शक्ती चांगली दिशा देऊ शकते. एकाचवेळी इतक्या ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानातून एक एकराचा परिसर काही तासांत आपण स्वच्छ करु शकतो. हे आज वाडदईकरांनी दाखवून दिले आहे. प्रकल्प कार्यकर्ते प्रकाश देवळे यांनी  वाडदईतील ग्रामस्थांचे तसेच सुभाष कांबळे आणि विनायक कांबळे यांचे आभार मानले. Cleanliness in Vivekanandalaya

Tags: Cleanliness in VivekanandalayaGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share122SendTweet77
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.