• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

by Manoj Bavdhankar
January 3, 2023
in Health
121 1
0
Health check up camp at Tawasal
237
SHARES
677
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विनर्स परिवार कोल्हापूर व तवसाळ ग्रामस्थांचा संयुक्त उपक्रम

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील तवसाळ येथे विनर्स परिवार कोल्हापूर आणि तवसाळ ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुतन वर्षाच्या प्रारंभी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर 1 येथे हे शिबीर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन तवसाळ महामाई – सोनसाखळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि खोत सन्मा. मोहन (बंधू) गडदे यांनी स्वतःची शारीरिक तपासणी करून केले. Health check up camp at Tawasal

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

या शिबिरामध्ये विनर्स परिवार कोल्हापूर यांचे सदस्य आणि नरवण गावचे सुपुत्र निवृत्त शासकीय अभियंता सुधीर वेल्हाळ, प्रियंका वेल्हाळ, राजेश्वरी वेल्हाळ, नम्रता माळवदे यांच्या माध्यमातून संपन्न झाले. या शिबिरामध्ये कराडा स्कॅन मशीनद्वारे संपूर्ण शरीराची तपासणी करून आपली उंची, वजन, शरीरातील चरबी, पाण्याचे प्रमाण, शारीरिक क्षमता याची योग्य माहीती देऊन शरीर निरोगी राहण्याकरता नियमित खाण्याबद्दलचे मार्गदर्शन करण्यात आले. शिबिर आयोजित करण्यासाठी कातळे ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रियांका निलेश सुर्वे यांनी विशेष प्रयत्न केले होते तर शिबिर नियोजीत पद्धतीने पार पडण्यासाठी किरण गडदे, विवेक गडदे, सार्थक सुर्वे यांनी विशेष मेहनत घेतली. Health check up camp at Tawasal

यावेळी तवसाळ ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष प्रदीप सुर्वे, भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे,  राजेश सुर्वे, उदेश शिरधनकर, मनोहर मयेकर,सुदेश सुर्वे, विलास सुर्वे, किसन पड्याळ, एकनाथ गडदे, शैलेश नार्वेकर, शांताराम सुर्वे, मोरेश्वर गडदे, प्रकाश सुर्वे, प्राजक्ता सुर्वे, संगीता सुर्वे, प्रीती गडदे, प्रतीक्षा सुर्वे, लता सुर्वे, विनया सुर्वे, माजी पोलीस पाटील सत्यवान गडदे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ मान्यवर मंडळी उपस्थित होती.  Health check up camp at Tawasal

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHealth check up camp at TawasalLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share95SendTweet59
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.