• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेलदुर नवानगर शाळेत बालिका दिन साजरा

by Ganesh Dhanawade
January 3, 2023
in Guhagar
98 1
0
Girl's Day celebration in Nawanagar school
193
SHARES
551
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 03 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी या शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. Girl’s Day celebration in Nawanagar school

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

 कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थिनी अंत्रा तुषार पालशेतकर हिच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. तर दीप प्रज्वलन विद्यार्थिनी श्रुती समीर वनकर हिच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्याध्यापक मनोज पाटील, शिक्षिका सत्वशीला जगदाळे, पल्लवी घुले अंजली मुद्दमवार व विद्यार्थी उपस्थित होते. Girl’s Day celebration in Nawanagar school

आदर्श शाळा वेलदुर नवानगरमध्ये झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राज संदीप वरवटकर यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक दीप अशोक नाटेकर, तृतीय क्रमांक आर्या पुंडलिक नाटेकर यांनी पटकावला.  तर निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वेदिका राजेंद्र जाधव, द्वितीय क्रमांक स्मित उमेश नाटेकर, तृतीय क्रमांक लवेश शशिकांत नाटेकर यांनी पटकावला.जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक डिजिटल व आनंददायी शाळा वेलदूर नवानगरमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. Girl’s Day celebration in Nawanagar school

बालिका दिननिमित्त सत्वशीला जगदाळे, अंजली मुद्दमवार, पल्लवी घुले यांनी मनोगत व्यक्त केले. मनोज पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, पहिल्या विचारवंत कवयित्री होत्या. त्यांच्या कार्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. शेतातील मातीची पाटी व झाडाच्या फांदीच्या काटकीचा लेखणीचा उपयोग करून सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा श्री गणेशा सुरू झाला. सावित्रीबाई फुले यांच्या महिलांबाबतच्या समाज कार्यामुळेच स्त्रिया आज सन्मानाच्या जागेवर विराजमान झालेल्या आहेत. Girl’s Day celebration in Nawanagar school

Tags: Girl's Day celebration in Nawanagar schoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share77SendTweet48
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.