• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे येथे भिषण अपघात

by Mayuresh Patnakar
December 31, 2022
in Guhagar
548 6
0
Terrible accident at Patpanhale
1.1k
SHARES
3.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

समोरासमोर दोन गाड्यांची धडक,  2 मुलांसह 6 जण जखमी

गुहागर, ता. 31 : गुहागर चिपळूण मार्गावर पाटपन्हाळे साळवी स्टॉप परिसरात चारचाकी आणि रिक्शा यांची समोरासमोर धडक बसली. या अपघातात पाज पंढरीतील 2 लहान मुले व त्यांचे आई वडिल, अडुर बुधल येथील 1 महिला आणि गुहागरमधील 1 पुरुष असे 6 जण गंभीर जखमी आहेत. शृंगारतळीतील विष्णुपंत पवार रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन सर्वांना अधिक उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले आहे. हा अपघात आज शनिवारी (ता. 31) सकाळी 11 च्या सुमारास घडला.  Terrible accident at Patpanhale

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

दापोली तालुक्यातील पाज पंढरीत गावातील राजेश नरेश चुणेकर (वय 29) यांच्या मालकीच्या रिक्षेतून (एम.एच.08 एक्यु 2997) प्रभा कमलेश चुणेकर (वय 40), उत्कर्ष कमलेश चुणेकर (वय 12), पंकज चोगले (वय 19), हे तिघेजण शृंगारतळीला आले. त्यांच्यासोबत मनोहर रघुनाथ चोगले (वय 46, पाजपंढरी) आणि कमलेश कृष्णा चुणेकर हे स्वतंत्र दुचाकीने शृंगारतळीला आले. ही सर्व मंडळी अडूर बुधल येथे स्वाध्याय परिवाराच्या कार्यक्रमासाठी जात होती. शृंगारतळीतील बाजारातून दुपारच्या भोजनासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य त्यांनी घेतले. तेथेच त्यांना अडूर बुधल येथे रहाणाऱ्या अंजली लक्ष्मण धोपावकर (वय 60)  भेटल्या. त्यांना रिक्षेत घेवून ही सर्व मंडळी अडूर बुधलकडे जाण्यासाठी निघाली. पाटपन्हाळे साळवी स्टॉप परिसरात रिक्षा आली असताना गुहागर कडून चिपळूणकडे निघालेल्या चारचाकी वहानाची आणि रिक्षाची समोरासमोर धडक बसली. हे चारचाकी वाहन (एमएच 08 एक्स 0809) सचिन ओक (रा. गुहागर वय 39) चालवत होते. ते आपल्या आजारी वडील सतिश ओक (रा. गुहागर, वय 73) यांना उपचारासाठी घेवून निघाले होते.  Terrible accident at Patpanhale

हा धडक इतकी जोरात होती की रिक्षाचालकासह रिक्षातील 4 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. रिक्षा चालक राजेश चुणेकर यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. प्रभा कमलेश चुणेकर यांचा एक पाय पूर्णपणे फिरला. अंजली धोपावकर, उत्कर्ष चुणेकर आणि पंकज चोगले यांच्या हात पाय आणि तोंडाला दुखापत झाली. चार चाकी वाहनातील सतिश ओक यांना गाडीतून ओढून बाहेर काढावे लागले. चारचाकी वाहन चालक सचिन ओक यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तातडीने 2 रुग्णवाहिकांद्वारे सर्व जखमींना विष्णूपंत पवार रुग्णालय श्रृंगारतळी येथे नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करुन सर्वांना अन्यत्र हलविण्याच्या सूचना तेथील डॉक्टरांनी दिल्या.  सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे मनोहर चोगले यांनी सांगितले आहे.  Terrible accident at Patpanhale

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTerrible accident at PatpanhaleUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share431SendTweet269
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.