कुडलीच्या माटलवाडी युवा प्रतिष्ठान आयोजित; उपविजेता पालपेणे मधलीवाडी संघ
गुहागर, ता. 31 : कुडली माटलवाडी युवा प्रतिष्ठान आयोजित गुहागर तालुका अंतर्गत यु ट्यूब लाईव्ह युवा चषक 2022-23 या चषकावर तवसाळ बाबरवाडी क्रिक्रेट संघाने नाव कोरले. 20 हजार रुपयांच्या रोख बक्षिसासहीत आकर्षक चषक पटकावल्याचा आनंद बाबरवाडी क्रिक्रेट संघातील खेळाडूंबरोबरच तवसाळमधील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरुनही ओसंडून वहात होता. Tavasal Babarwadi won the youth cup
तालुक्यातील कुडलीच्या माटलवाडी युवा प्रतिष्ठानने तालुकास्तरीय यु ट्यूब लाईव्ह युवा चषक 2022-23 स्पर्धेचे आयोजन केले होते. दिनांक 24 व 25 डिसेंबर 2022 असे दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना तवसाळ बाबरवाडी क्रिकेट संघ आणि पालपेणे मधली वाडी संघ यांच्यात रंगला. प्रथम गोलंदाजी करताना बाबरवाडी संघाच्या गोलंदाजानी पालपेणे मधली वाडी संघाला 21 धावांवर रोखले. माजी सरपंच संदीप जोशी यांच्यासह प्रतिक, दिवेश आणि प्रविण यांनी छान गोलंदाजी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या नरेश, गणेश व आशिष यांनी जबाबदारीने खेळ करत तवसाळ बाबरवाडी संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवून दिला. Tavasal Babarwadi won the youth cup


या सामन्यातील विजेता तवसाळ बाबरवाडी क्रिक्रेट संघाचा मान्यवरांच्या हस्ते रोख रु. 20 हजार आणि आकर्षक चषक देवून सन्मान केला. तर रोख रु. 15 हजार आणि चषक देवून उपविजेत्या पालपेणे मधलीवाडी क्रिकेट संघाला गौरविले. उत्कृष्ट फलदांज म्हणून पालपेणे संघातील स्वप्निल, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तवसाळ बाबरवाडी संघातील संदिप जोशी, मालिकावीर म्हणून नरेश नाचरे या खेळाडुंची निवड करण्यात आली. Tavasal Babarwadi won the youth cup


तवसाळ बाबरवाडी संघाने मिळविलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिपक जोशी, बाबरवाडीचे अध्यक्ष सुधाकर येद्रे यांनी अभिनंदन केले आहे. Tavasal Babarwadi won the youth cup