• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पहिल्या समुद्र सफारीचा मान विद्यार्थ्यांना

by Mayuresh Patnakar
December 30, 2022
in Guhagar
227 2
0
Adventure sports on the sea of Palshet

पालशेत : समुद्रकिनाऱ्यावर जेटस्कीचे पूजन करताना जीतेंद्र जोशी

446
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पालशेतच्या समुद्रावर साहसी खेळांचे उद्‌घाटन

गुहागर, ता. 30 : पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी जेट स्की द्वारे सागरी साहसी खेळांची सुविधा गाज रिसॉर्टतर्फे सुरु करण्यात आली आहे. या सुविधेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 29) सायंकाळी करण्यात आले. या सुविधेमुळे पर्यटकांचे पाय पालशेतच्या समुद्रकिनाऱ्याकडे वळतील. त्यातून पालशेतमध्येही पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. अशी अपेक्षा लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू यांनी व्यक्त केली. Adventure sports on the sea of Palshet

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

गाज रिसॉर्टने वर्षअखेरीस पालशेतच्या पर्यटन विकासात आणखी भर घातली आहे. सी स्टॉर्म व सी स्पिरिट या दोन नविन जेट स्की द्वारे सागरी साहसी खेळ सुविधा 30 डिसेंबर 2022 पासून पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरु होत आहे. सध्या सकाळी 8 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 6 या वेळेत जेट स्कीद्वारे समुद्रसफरीचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. Adventure sports on the sea of Palshet

Adventure sports on the sea of Palshet
पालशेत : जेटस्कीवरुन समुद्र सफारीसाठी निघालेले अर्णव पाटील व शालवी तोडणकर

सागरी साहसी खेळांच्या पालशेत किनाऱ्यावरील सुविधेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 29) पारंपरिक पध्दतीने करण्यात आले. जीतेंद्र जोशी यांनी सुरवातीला सागरपुजन त्यानंतर दोन्ही जेटस्कींचे पूजन केले. त्यानंतर पालशेतचे उपसरपंच महेश वेल्हाळ, उद्योजक राजन दळी,  लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू, गुहागर शहर व्यापारी संघटना अध्यक्ष  नरेश पवार, पालशेतमधील हॉटेल व्यावसायिक पांडुरंग विलणकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. Adventure sports on the sea of Palshet

Adventure sports on the sea of Palshet

यावेळी आंबा बागायतदार विलास ओक (महाजन), नरवणचे डॉ. कैलास वैद्य व सौ. मधुरा वैद्य, सरपंच सौ. संपदा चव्हाण,  पंकज बीर्जे, पद्मनाभ जोशी, नरेंद्र नार्वेकर, महेश तोडणकर, सौ. श्रीया सोमण, केदार सोमण, बाबासाहेब राशिनकर, नाखरे गुरुजी, सिताराम पटेकर, सौसारिका जोशी, पुरोहित राहुल ओक उपस्थित होते. Adventure sports on the sea of Palshet

Adventure sports on the sea of Palshet

उद्‌घाटनानंतर जेटस्कीवरुन पहिली समुद्र सफर करण्याचा मान ई 4 थी मध्ये प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झालेला अर्णव पाटील, इ. 3 री मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी शालवी तोडणकर आणि जिल्हास्तरीय वक्त्तृत्त्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारी पालशेतकर विद्यालयाची विद्यार्थीनी प्रगती जोशी यांना देण्यात आला. Adventure sports on the sea of Palshet

यावेळी मनोगत व्यक्त करताना जीतेंद्र जोशी म्हणाले की, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड तसेच पर्यटन विभागाच्या सर्व परवानग्या घेऊन ही सुविधा पालशेत समुद्रकिनारी आपण सुरु केली आहे. या कामासाठी मेरीटाईम बोर्डाचे क्षेत्रीय बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले यांचे मार्गदर्शन आणि योगदान मिळाले. या सुविधेमुळे पालशेतमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. त्यातून रोजगार निर्मिती होईल. Adventure sports on the sea of Palshet

Tags: Adventure sports on the sea of PalshetGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share178SendTweet112
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.