• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत प्रथमच सागर महोत्सव

by Guhagar News
December 30, 2022
in Ratnagiri
219 2
0
Sagar Festival first time in Ratnagiri
430
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सागर संरक्षण, जतनासाठी एक पाऊल पुढे

रत्नागिरी, ता. 30 : साऱ्या जगात सर्वाधिक व्यापून राहिलेले महासागर जपण्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी एक पाऊल टाकत रत्नागिरीत आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन व सहकारी संस्थांच्या विद्यमाने प्रथमच सागर महोत्सव होणार आहे. या महोत्सवात व्याख्याने, लघुपट, माहितीपटांचे सादरीकरण, वाळूशिल्प पाहण्याची पर्वणी आणि विशेष म्हणजे खडकाळ समुद्रकिनारे व खारफुटी जंगलाची सफर करता येणार आहे. १३ व १४ जानेवारी आणि २१ व २२ जानेवारी अशा दोन टप्प्यांत महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १३ जानेवारीला सकाळी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्रमुख पाहुणे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची लज्जत लेखिका व मुंबई आकाशवाणीच्या आरजे दुहिता सोमण खेर यांच्या निवेदनामुळे आणखी वाढणार आहे. Sagar Festival first time in Ratnagiri

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

रत्नागिरीतील आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजीकल सोसायटी आणि विवांत अनटेम्ड फौंडेशन या सहयोगी संस्था आयोजित पहिल्या सागर महोत्सवात भरगच्च कार्यक्रम आहेत. यातून विद्यार्थी, किनारपट्टी भागातील रहिवासी व रत्नागिरीकरांमध्ये सागर संरक्षणाबाबत जनजागृती होणार आहे. Sagar Festival first time in Ratnagiri

सागर महोत्सव १३ व १४ जानेवारी २०२३ आणि २१ व २२ जानेवारी २०२३ या चार दिवशी होणार आहे. १३ जानेवारीला सकाळी ९ वाजता उद्घाटन, त्यानंतर ९.३० वाजता सह्याद्री निसर्गमित्रचे भाऊ काटदरे यांचे कासवांचे संवर्धन या वर व्याख्यान होईल. तसेच १०.३० वाजता खारफुटी संवर्धनाबाबत लक्ष्मीकांत देशपांडे यांचे व्याख्यान होणार आहे. सकाळी ११.३० ते १.३० या वेळेत समुद्र व पर्यावरण संवर्धनाविषयक माहितीपट, लघुपट प्रदर्शित केले जाणार आहेत. त्यानंतर २.३० ते ४ वाजेपर्यंत या क्षेत्रातील पुरस्कार विजेते माहितीपटांचे सादरीकरण होणार आहे. ४ वाजता खडकाळ समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधता या विषयावर डॉ. अमृता भावे व्याख्यान देणार आहेत. Sagar Festival first time in Ratnagir

१४ जानेवारीला सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत माहितीपट दाखवण्यात येतील. १२.३० ला शाश्वत मासेमारी या विषयावर डॉ. केतन चौधरी यांचे व्याख्यान होईल. दुपारी २.३० वाजता मानवजातीच्या भविष्यासाठी महासागर या विषयावर डॉ. समीर डामरे, दुपारी ३.३० वाजता स्थानिक पक्षी या विषयावर प्रसाद गोखले व विराज आठल्ये यांचे माहितीपूर्ण व्याख्यान होईल. ४ वाजता प्रश्नमंजुषा स्पर्धा होईल. Sagar Festival first time in Ratnagiri

२१ आणि २२ जानेवारीला सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत भाट्ये समुद्रकिनाऱ्याची पायी सैर घडवण्यात येणार आहे. या वेळी प्रदीप पाताडे, अमृता भावे मार्गदर्शन करतील. ७ ते ९.३० या वेळेत कुर्ला येथील खारफुटी जंगलाची सफर संजीव लिमये व संतोष तोसकर घडवतील. तसेच सायंकाळी दुपारी ३ ते ६ या वेळेत मांडवी येथील खडकाळ समुद्रकिनाऱ्याची सफर प्रदीप पाताडे व अमृता भावे घडवतील. प्रत्येकाच्या आवडीनुसार समुद्रकिनारा, खारफुटी या भागात विद्यार्थी, रत्नागिरीकरांना सैर करता येणार आहे. याच कालावधीत देखणी वाळूशिल्प भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर पाहण्याची संधी पर्यटक आणि रत्नागिरीकरांना मिळणार आहे. Sagar Festival first time in Ratnagiri
यासंबंधी अधिक माहितीसाठी आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनचे प्रमुख नंदकुमार पटवर्धन मो. नं. 9970056523 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSagar Festival first time in RatnagiriUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share172SendTweet108
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.