• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तालुकास्तरीय “गुहागर सरस” विक्री व प्रदर्शन

by Mayuresh Patnakar
December 29, 2022
in Guhagar
140 2
0
Taluka level sales and display
275
SHARES
787
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. ३० व ३१ डिसेंबर पोलीस परेड मैदान, तहसील कार्यालय गुहागर

गुहागर, ता. 29 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत तालुका अभियान कक्ष गुहागर आणि पंचायत समिती गुहागर मार्फत तालूकास्तरीय सरस प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.  तालुक्यातील स्वयंसहाय्यता समहुातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पोलीस परेड मैदान, तहसील कार्यालय मागे दिनांक ३० डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत प्रदर्शन व विक्रीचे करण्यात  येणार आहे. Taluka level sales and display

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

अभियानाचा मुळ व मुख्य उद्देश ग्रामीण भागातील समूहात समाविष्ट झालेल्या महिलांची उपजीविका बळकट करणे, या माध्यमातून शाश्वत उपजीविका निर्माण होण्यासाठी कार्यरत राहणे आणि ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावणे हा आहे. सद्य स्थितीत अभियानाच्या माध्यमातून परंपरागत किंवा अस्तित्वात असलेली उपजीविका बळकट करण्यासाठी फिरता निधी, समुदाय गुंतवणूक निधी, उत्पादक समूहांसाठी चा निधी, समुदाय उद्योग निधी, जोखीम प्रवणता निधी, बँक अर्थसहाय्य, प्रधान मंत्री सूक्ष्म खाद्य उत्त्पन्न योजना (PMFME) बीज भांडवल विविध शासकीय योजनांचा लाभ व विविध प्रदर्शणाच्या माध्यमातून अन्न प्रक्रियाउद्योग, मसाले, पापड, शिवणकाम,  विणकाम, ब्युटीपार्लर, विक्री केंद्र व इतर छोटे मोठे उद्योग व उत्पादन सेवा करीत आहेत. व्यवसाय वाढीसाठी आवश्यक भांडवल उत्पादित केलेल्या मालाचे एकत्रीकरण, ग्रेडेशन, पँकेजिंग, लेबलिंग ब्रांडिंग करून अशा प्रकारच्या प्रदर्शनाद्वारे त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. Taluka level sales and display

महिला स्वयंसहाय्यता समूह यांना मिळणार हक्काची बाजार पेठ

सदर प्रदर्शनामध्ये गुहागर तालूक्यातील ग्रामपंचायती मधून एकूण २७ उत्पादने व १० जेवणाचे स्टाँल असे एकूण ३७ स्वयंसहाय्यता समहू सहभागी होणार आहेत. स्वयंसहाय्यता समूह यांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते. Taluka level sales and display

रत्नागिरी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. किर्ति किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परीक्षित यादव व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक श्रीम. नंदिनी घाणेकर व जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री.अयाज पिरजादे यांचे विशेष मार्गदर्शनाखाली प्रथमच अशा पद्धतीचे तालकुा स्तरीय प्रदर्शन गुहागर मध्ये आयोजित केले जात आहे. प्रदर्शनाचा कालावधी हा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस असल्याने पर्यटक,  भाविक व शाळांच्या सहली मोठ्या प्रमाणात समद्रुकिनारी भेट देत असतात. त्याचा फायदा उत्पादित मालाची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होईल, असे प.स. गटविकास अधिकारी श्री. प्रशांत राउत यांनी सांगितले. Taluka level sales and display

प्रदर्शनाच्या कालावधीत सायंकाळी स्वयंसहाय्यता समहूातील सदस्य यांचे मनोरंजन पर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये लोककला, लोकगीत, वैयक्तिक व सामुहिक सांस्कतिक कार्यक्रम असणार आहेत. तसेच सहभागी स्टाँल मधील सहभागी महिलांसाठी फनी गेम्स आयोजित करण्यात येणार आहेत. Taluka level sales and display तरी या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी मोठया संख्येने घ्यावा, असे आव्हान तालूका अभियान व्यवस्थापक श्रीम. दुर्वा ओक यांनी केले आहे. Taluka level sales and display

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTaluka level sales and displayUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share110SendTweet69
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.