गुहागर, ता. 29 : गुहागर खालचापाट येथील निवृत्त तलाठी प्रकाश शांताराम गोयथळे यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७४ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, दोन जावई, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांची दशक्रिया विधी रविवार दि. १ जानेवारी 2023 रोजी गुहागर खालचापाट येथील स्मशानभूमीत होणार आहे. Talathi Prakash Goythale is No More
प्रकाश गोयथळे हे गेली 32 वर्षे तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या कामातील अधिक वर्ष ते साखरपा येथे तलाठी म्हणून सेवा बजावली होती. प्रकाश गोयथळे हे मे 2022 मध्ये शारीरिक आजाराने आजारी झाले. त्यादरम्यान त्यांना विविध हॉस्पिटलमध्ये त्यांचे निदानही करण्यात आले. त्यानंतर त्यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती व्यवस्थित झाली होती. परंतु गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृती मध्ये कोणती सुधारणा न होता, त्यांचे प्रकृती जास्त बिघडली. आणि त्यांचे निवासस्थानीच निधन झाले. Talathi Prakash Goythale is No More

