• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाकिस्तानी नौका ‘अल सोहेली’ पकडली

by Mayuresh Patnakar
December 28, 2022
in Bharat
296 3
0
ICG intercepts Pak boat
582
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ICG  आणि गुजरात ATS ची संयुक्त कारवाई

नवी दिल्ली, ता. 28 : भारतीय तटरक्षक दल (ICG)  आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत पाकिस्तानी नौका ‘अल सोहेली’ पकडली. ICG intercepts Pak boat या नौकेतून शस्त्रे, दारुगोळा आणि 300 कोटी रुपयांचे 40 किलो मादक पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच नौकेवरील 10 कामगारांना अटक करुन ओखा बंदरात आणण्यात आले. ही कारवाई रविवार (25 डिसेंबर) ला मध्यरात्री करण्यात आली. गेल्या 18 महिन्यातील ही सातवी कारवाई आहे. ICG intercepts Pak boat

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

भारतीय सागर सीमेवर गेली दिड वर्ष संशयास्पद बोटी सापडणे, भारतीय मच्छीमार नौकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुजरात राज्यातील सागरी किनारपट्टीवर भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने गेल्या 18 महिन्यात सातव्यांदा कारवाई करत पाकिस्तानी नौका ताब्यात घेतली. ICG intercepts Pak boat

ICG intercepts Pak boat

ICG intercepts Pak boat

रविवारी, 25 डिसेंबरला रात्री आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेवर भारतीय तटरक्षक दलाची वेगवान नौका अरिंजय (ICGS Arinjay) गस्त घालत होती. रात्री उशिरा एक नौका भारतीय सीमेच्या आत संशयास्पदरित्या फिरत असल्याचे तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना समजले. अरिंजयवरील अधिकाऱ्यांनी सदर नौकेला थांबण्याचा इशारा दिला. संशयास्पद नौका तिथून पळून जाऊ लागल्यावर तटरक्षक दलाच्या जवानांनी चेतावणी देण्यासाठी गोळीबार केला. तटरक्षक दलाच्या आक्रमणामुळे नौकेतील खलाशांनी शरणागती पत्करली. त्यानंतर तटरक्षक दलाच्या सशस्त्र जवानांनी नौकवर ताबा मिळवला.

सदर मच्छीमार नौकेचे नाव ‘अल सोहेली’ असे आहे. तटरक्षक दलाच्या जवानांनी नौकेवर शोधमोहिम राबवली. तेव्हा शस्त्रे, दारुगोळा आणि 300 कोटी रुपयांचे सुमारे 40 किलो अमली पदार्थ सापडले. त्याचप्रमाणे अल सोहली नौकेवरील 10 पाकीस्तानी कामगारांनाही तटरक्षक दलाच्या जवानांनी ताब्यात घेतले. गुजरातमधील ओखा बंदरात मुद्देमालासह 10 पाकीस्तानी कामगारांना गुजरात दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले. ICG intercepts Pak boat

@IndiaCoastGuard in joint ops with ATS #Gujarat, apprehended #Pakistani Fishing Boat Al Soheli with 10 crew in Indian waters. During rummaging Arms, ammunition & approx 40 Kgs #narcotics worth Rs 300 cr found concealed. Boat being brought to #Okha for further investigation. pic.twitter.com/3YwzKne6bQ

— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) December 26, 2022

गेल्या 18 महिन्यात गुजरात दहशतवाद विरोधी पथक व भारतीय तटरक्षक दलाने  केलेल्या संयुक्त कारवायांमध्ये 1,930 कोटी रुपयांचे एकूण 346 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून 44 पाकिस्तानी आणि 7 इराणी कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले आहे. ICG intercepts Pak boat

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiICG intercepts Pak boatLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share233SendTweet146
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.