गुहागर, ता. 28 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात वीर बालदिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. Veer Children’s Day celebrated in Patpanhale School
बलिदानपुत्र (वीरपुत्र ) श्री. जोरावरसिंह व श्रीफतेसिंह यांच्या सर्वोच्च बलिदानाबाबत तसेच शीख संप्रदाय सन्मान, अस्मिता हेतू व रक्षण या उद्देशाने विद्यालयात वीर बालदिवस संपन्न झाला. विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. एस. एस. चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. विद्यालयातील शिक्षक श्री. एस. वाय. भिडे यांनी वीर बालदिवस साजरा करण्याचा हेतू स्पष्ट केला. श्री. जोरावरसिंह व फतेसिंह यांचे कार्य व योगदान, पराक्रमाची जाणीव निर्माण करणे आदी विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. Veer Children’s Day celebrated in Patpanhale School

मुख्याध्यापक एम. ए. थरकार यांनी देशातील विविधता, वीर पुरुषांचे योगदान, श्री जोरावरसिंह व फतेसिंह यांचे योगदान याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पर्यवेक्षक श्री. एस. टी. गावडे, शिक्षक श्री. एस. एम. आंबेकर व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. Veer Children’s Day celebrated in Patpanhale School

