• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मार्गताम्हाने इंग्लिश मीडियम स्कूलचा नामकरण सोहळा

by Ganesh Dhanawade
December 28, 2022
in Ratnagiri
127 1
0
Naming Ceremony of English Medium School
250
SHARES
713
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आय.आय.एस.ई.आर कोलकत्ता आणि त्रिवेंद्रमचे अध्यक्ष डॉ. श्री. अरविंद नातू यांच्या ह्स्ते

गुहागर, ता. 28 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान संचलित, मार्गताम्हाने येथील इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचा नामकरण सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शाळेचे नामकरण डि. व्ही. सावरगावकर प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल आणि डॉ. श्रीधर चितळे सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल असे करण्यात आले. आय.आय.एस.ई.आर कोलकत्ता आणि त्रिवेंद्रमचे अध्यक्ष डॉ. श्री. अरविंद नातू यांच्या ह्स्ते करण्यात आले. Naming Ceremony of English Medium School

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

यावेळी यशवंत वामन चव्हाण आणि कुटुंबिय, वसंत उर्फ नंदूशेठ गोंधळी, डॉ. सुमितकुमार पाटील या देणगीदारांचा सन्मान करण्यात आला. तसेच रश्मी चितळे यांनी डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या शैक्षणिक व वैद्यकीय सेवेच्या कार्याचा गौरव केला. शिक्षणाच्या प्रवाहात सर्वसामान्यांना आणण्यासाठी तात्यांनी अलौकीक कार्य केले. आज विविध दानशूरांच्या देणगीतून उभ्या असलेल्या या भव्य वास्तूतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा व कर्तुत्वाचा आणि चारित्र्याचा पाया भक्कमपणे बांधला जाईल आणि ही शाळा केवळ शाळा न राहता हे संस्कार दीप होईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. Naming Ceremony of English Medium School

डॉ. अरविंद नातू यांनी समाजाच्या गरजा ओळखून शिक्षण क्षेत्रात डॉ. तात्या नातू यांनी क्रांती केली. त्यांनी ग्रामीण 20 शाळा उभारल्या. आज आपण अनेक शाळांची संस्थान आणि सम्राट पाहतो. पण तात्यांनी असे केले नाही. तात्यांनी संबंधीत गावांमध्ये शाळा उभ्या करुन त्या गावांना हस्तांतरीत केल्या. शिक्षणाचे हे कार्य त्यांनी योग्य व्यक्तींकडे सोपवले. यावेळी अरविंद नातू यांनी श्रीधर उर्फ प्रकाश चितळे यांच्याबद्दल माहिती देऊन शिक्षण आणि संशोधनात त्यांनी मोठी झेप घेतल्याचे सांगितले. संस्था या केवळ पैशावर उभ्या राहत नाहीत तर त्यासाठी मनुष्यबळ लागते. या बळावरच संस्था चालतात असे सांगून त्यांनी देणगीदारांचा गौरव केला. Naming Ceremony of English Medium School

Naming Ceremony of English Medium School

यावेळी विशेष अतिथी म्हणून शंतनुराव किर्लोस्कर अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. कँप्टन चंद्रशेखर चितळे, रश्मी चितळे – अभ्यंकर, स्नेहलता तावरे, डॉ. मोडक, सौ. सुवर्णा खोले, श्रीमती साधना चितळे, डॉ. जान्हवी चितळे, डॉ. कालिंदी मोडक, डॉ. नातू प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विनय नातू, सर्व शिक्षणप्रेमी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. Naming Ceremony of English Medium School

प्रारंभी प्रास्ताविकात देवखेरकी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनंत साळवी यांनी डॉ. नातू प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेच्या असलेल्या शाळा, वसतिगृह व त्यांचे चालणारे कामकाज याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन संजय सोहनी व पराग कदम यांनी केले. यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा डॉ. विनय नातू, डॉ. सौ. विनिता नातू, डॉ. सौ. नीला नातू, डॉ. विवेक नातू, डॉ. विकास नातू यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. Naming Ceremony of English Medium School

अध्यक्षीय भाषणात डॉ. विनय नातू यांनी शाळा सुरु करण्यापासून ते वास्तू उभी राहण्यापर्यंतच्या सर्व अडचणी कशा आल्या याबद्दल माहिती दिली. शृंगारतळी ते चिपळूण असे 40 कि.मी. मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकायला जावे लागे. त्यामुळे ही गरज ओळखून गुहागर – चिपळूणच्या मध्यवर्ती ठिकाणी इंग्रजी शाळा असावी. म्हणून मार्गताम्हाने येथे आम्ही शाळा सुरु केली असल्याचे सांगितले. यासाठी अनेक दानशूरांनी देणग्या दिल्या यातूनच ही वास्तू उभी राहिल्याचे स्पष्ट केले. आभार संजय सोहनी यांनी मानले. Naming Ceremony of English Medium School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNaming Ceremony of English Medium SchoolNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share100SendTweet63
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.