उत्तीर्ण विद्यार्थ्यांची दि. ०९/०१/२०२३ रोजी दुसऱ्या टप्प्याची परीक्षा
गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी यांच्या वतीने 4 ऑक्टोबर 2022 रोजी विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत गुहागर मधील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर ची आर्या मंदार गोयथळे हिने प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. Arya first in science entertainment competition
विज्ञान रंजन स्पर्धा पाचवी ते सातवी प्राथमिक गटात ८१ विद्यार्थी तर आठवी ते दहावी माध्यमिक गटात ९० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये प्राथमिक गटात प्रथम आर्या मंदार गोयथळे (श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर), द्वितीय अनुष्का जाधव ( श्रीम. र. पा. पालशेतकर माध्यमिक विद्यालय पालशेत), तृतीय क्रमांक विभागून संस्कृती पाते (सरस्वती विद्या मंदिर जामसुत), समृद्धी सुरेश आंबेकर तृतीय क्रमांक (न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे) यांनी यश संपादन केले. Arya first in science entertainment competition
तर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक वनु आकिब आदिल, (न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे), द्वितीय वाशिम महंमद सिद्धी घारे ( शृंगार तळी उर्दू हायस्कूल), तृतीय पायल मंगेश गमरे (वरदान इंग्लिश स्कूल) यांनी यश संपादन केले आहे. Arya first in science entertainment competition

गुहागर तालुक्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शनिवार दिनांक ०९/०१/२०२३ रोजी दुसऱ्या टप्प्याची परीक्षा चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे दुपारी १२ ते १ वाजता होणार आहे. त्यातून जिल्हास्तर प्राथमिक पाच क्रमांक व माध्यमिक पाच क्रमांक काढण्यात येणार आहेत. Arya first in science entertainment competition

