नगरसेवक अमोल गोयथळे यांचा पुढाकार
गुहागर, ता. 27 : महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर शहरांमधील अंगणवाड्यामध्ये खाऊ वाटप करण्यात आले. गुहागर नगरपंचायतीचे प्रभाग १६ मधील नगरसेवक अमोल गोयथळे यांच्या माध्यमातून हा खाऊ वाटप केला. Distribution of food on Samant’s birthday
अमोल गोयथळे हे गुहागर नगरपंचायतीचे सक्रिय नगरसेवक म्हणून ओळखले जातात. प्रभागातील विकासकामांबरोबरच सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असतात. सुरुवातीला आ. भास्कर जाधव यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम करत होते. पक्षातील अंतर्गत वादामुळे ते पक्षापासून दूर गेले. गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्व पक्षीय गुहागर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवून प्रभाग १६ मध्ये निवडून आले. तेव्हापासून कोणताही पक्षीय भेदभाव न ठेवता नागरिकांची कामे करत आहेत.

कोरोना काळात मुंबईकर चाकरमान्यांसाठी मोठे योगदान दिले होते. याचवेळी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीमध्ये पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली होती. परंतु, त्यानंतर पक्षाकडून विकासकामे व स्थानिकांच्या रोजगाराबाबत ठोस पावले उचलली गेली नाहीत. कार्यकर्त्यांना न्याय देता येत नसल्याने श्री. गोयथळे यांनी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत व किरण सामंत यांच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सक्रिय सहभागी झाले. सद्या गुहागर शहरासह तालुक्यात पक्ष संघटना वाढवण्याचे काम करत आहेत. Distribution of food on Samant’s birthday

पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त जांगळेवाडी अंगणवाडी व खालचापाट अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी प्रशांत भोसले किशोर गोयथळे, तुषार मोरे, श्री. डेरे, चंद्रशेखर लोखंडे, योगेश गोयथळे, मनोज गोलटकर, सुरज भोजने, आर्यन गोलटकर, अंगणवाडी सेविका दक्षता मोरे, रेषा मुंडेकर, सौ. मालप आदी उपस्थित होते. Distribution of food on Samant’s birthday


