नव्या वर्षात मोबाईल धारकांचा खिसा रिकामा होणार
गुहागर, ता. 26 : मोबाईल युजर्ससाठी धक्कादायक बातमी आहे. देशातील दोन प्रमुख टेलिकॉम प्रोव्हाइडर ‘एअरटेल’ आणि ‘जिओ’ या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. Recharge plan prices will increase

2022 वर्षाच्या सुरुवातीलाच ‘एअरटेल’ने परीक्षणासाठी काही सर्कलमध्ये 99 रुपयांचा पॅक हटवला होता. टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ करण्याची रणनीती व टेल्कोच्या ग्रामीण क्षेत्रात विस्तार करण्याच्या हेतूने हे केले होते. देशातील या दोन टेलिकॉम कंपनीकडून 10 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. 2023, 2024 आणि 2025 च्या चौथ्या तिमाहीत या दोन्ही कंपन्यांकडून 10 टक्के वाढ केली जाऊ शकते. मिळकत व मार्जिनवरून दबाव वाढल्याने प्लॅनच्या किंमती वाढू शकतात. Recharge plan prices will increase

सध्या ‘एअरटेल’ व ‘जिओ’मध्ये कमालीची स्पर्धा असून, वोडाफोन-आयडियाला घरघर लागल्याचे दिसते. ऑक्टोबर 2022 च्या आकडेवारीनुसार, वोडाफोन -आयडीयाच्या ग्राहकांची संख्या 3.5 मिलियनपर्यंत कमी झाली आहे. Recharge plan prices will increase
