गुहागर, ता. 24 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान, इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संगणक कक्ष अनावरण व उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी ‘श्रीकांत गद्रे संगणक कक्ष फलकाचे अनावरण व संगणक कक्ष विभागाचे उदघाटन श्रीमती अनुराधा गद्रे यांच्याहस्ते करण्यात आले. Computer Room in English Medium School
यावेळी उदघाटक श्रीमती अनुराधा गद्रे, प्रमुख अतिथी लेफ्टनंट कर्नल अद्वैत गद्रे, श्रीमती हेमलता जोशी, श्रीमती दिना गद्रे, संस्थेचे डॉ विवेक नातू, डॉ. विकास नातू, सौ. निला नातू, संस्थेच्या सर्व शाळांतील मुख्याध्यापक यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर श्रीकांत गद्रे यांच्या सेवाभावी जीवनकार्याची माहिती देण्यात आली. प्रास्ताविकामधून इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका कृतिका सोहनी यांनी इंग्लिश मिडीयम स्कूलची यशस्वी वाटचालीची माहिती दिली व संगणक कक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल गद्रे परिवाराचे आभार मानले. Computer Room in English Medium School

संस्थेच्या देवखेरकी शाळेतील मुख्याध्यापक अनंत साळवी यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा दैदिप्यमान विविधांगी उपक्रमांचा व कार्याचा उल्लेख करीत संस्थेचे अध्यक्ष डॉ विनय नातू व सर्व पदाधिकाऱ्यांचे योगदान विशद केले. प्रमुख अतिथी लेफ्टनंट कर्नल अद्वैत गद्रे यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन करून सैनिकी प्रशिक्षणात उपलब्ध असलेल्या नवनवीन संधी विषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. दिना गद्रे यांनी एनडी ए व सैनिकी स्कूल प्रशिक्षण विभागात विद्यार्थिनींना उपलब्ध झालेल्या नवनवीन संधीविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. स्वरा थरवळ यांनी केले. आभार सौ. सुप्रिया चव्हाण पाटील यांनी मानले. Computer Room in English Medium School

