प्रा बाळासाहेब लबडे यांची 14 पुस्तके प्रकाशित असून हा 4 काव्यसंग्रह आहे
गुहागर, ता. 24 : श्री.कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था कामेरी ता.वाळवा जि. सांगली यांचे वतीने २०२२ चे राज्यस्तरीय हौसाई मातृ -स्मृती साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डाँ. बाळासाहेब लबडे यांच्या “ब्लाटेंटिया” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन करण्यात येईल. (न्यू. इरा. पब्लिकेशन, पुणे. प्रकाशित) प्रसिद्ध कवी, मा उपजिल्हाधिकारी सांगली मा. श्री. गणेश मरकड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. Publication of Labade’s anthology
सदर कार्यक्रम हनुमान मंदिर, बाजारपेठ, मु .पो. कामेरी. ता .वाळवा .जि. सांगली. येथे दि. १ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजता संपन्न होईल. या कार्यक्रमाचे आयोजन मा ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील अध्यक्ष श्री. कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था यांनी केले आहे. प्रा बाळासाहेब लबडे यांची एकूण चौदा पुस्तके प्रकाशित असून हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह आहे. यास प्रस्तावना डाँ प्रकाश सपकाळे यांची असून डाँ महेंद्र कदम यांचा मलपृष्ठ मजकूर आहे तर मुखपृष्ठ व रेखाटने श्री प्रमोदकुमार अणेराव यांची आहेत. Publication of Labade’s anthology

या संग्रहावर प्रमुख भाष्य प्रा. डाँ .चंद्रकांत पोतदार प्रसिद्ध समीक्षक कोल्हापूर हे करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध लेखक, न्यू इराचेप्रकाशक, प्रसिद्ध उद्योजक, रावणकार, श्री. शरद तांदळे,पुणे लाभणार आहे. प्रमुख मान्यवर म्हणून डाँ. चंद्रकुमार नलगे ज्येष्ठ साहित्यिक कोल्हापूर, प्रा .डाँ .श्रीकांत पाटील प्रसिद्ध साहित्यिक कोल्हापुर, श्री. धनाजी घोरपडे, प्रसिद्ध कवी, समीक्षक, सांगली श्री. शाहीर शाहीद खेरटकर, चिपळूण हे असणार आहेत. Publication of Labade’s anthology

