वैदिक गणित आणि खगोलशास्त्र विषयांवर दोन दिवसीय कार्यशाळा
गुहागर, ता. 24 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय, गुहागर (Khare-Dhere-Bhosle College, Guhagar) येथे १९ व २० डिसेंबर २०२२ रोजी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वैदिक गणित आणि खगोलशास्त्र या विषयांवर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेस उद्घाटक म्हणून डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांची उपस्थिती लाभली. त्यांचे हस्ते सहभागी विद्यार्थ्याना ‘अभ्यास संच’ देऊन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. सदर कार्यशाळेस एकूण ४४ विद्यार्थी उपस्थित होते. Workshop conducted in KDB college

यावेळी डॉ. बापट यांनी आपल्या भाषणामध्ये प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत झालेला विज्ञानविकासाचा प्रवास उलगडून सांगितला आणि वैदिक गणिताची तसेच पारंपारिक भारतीय खगोलशास्त्राची अभ्यासकांनी आधुनिक विज्ञानाशी सांगड घालणे कसे आवश्यक आहे हे विशद केले. कार्यशाळेत प्रा. अभिजीत यादव व प्रा. पद्मनाभ सरपोतदार यांनी मार्गदर्शक म्हणून वैदिक गणिताच्या पद्धतीने बेरीज- वजाबाकी-गुणाकार-वर्ग-घन क्षणार्धात कसे काढता येतात यासंबंधी तसेच सूर्यमाला, तारे, आकाशनिरीक्षण, पंचांगातील खगोलशास्त्र, खगोलशास्त्रासाठी उपयुक्त सॉफ्टवेअर्स इ. विषयांवर व्याख्याने दिली. Workshop conducted in KDB college

यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य विराज महाजन यांचे हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, या कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर १७ डिसेंबर २०२२ रोजी दुर्बिणीद्वारे आकाशनिरीक्षणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. ज्याचे संचालन चिपळूण येथील शिक्षक श्री. दीपक आंबवकर यांनी केले. या वेळी शनि, गुरु आणि मंगळ हे ग्रह तसेच रात्रीच्या आकाशातील प्रमुख राशी व नक्षत्रांचे दर्शन रंजक महितीद्वारे घडविण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभ सुमारे ७० विद्यार्थी, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांनी घेतला. Workshop conducted in KDB college
