रत्नागिरी, ता. 22 : प्राथमिक शाळा हा विद्यार्थ्यांच्या उभारणीचा टप्पा आहे. त्यामुळे मुलांना रागावू नका, मुलं म्हणजे देवाघरची फुलं. विद्यार्थी हा शाळेचा खरा दागिना आहे. त्यांना गोड भाषेत समजावून सांगा. काम असं करावं की लोकांनी आपल्याकडे आले पाहिजे, असे मार्गदर्शन कै. गुरुवर्य रामचंद्र जोग करायचे. त्यांच्या मार्गदर्शनातून कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरची ( Agashe Vidyamandir ) वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन निवृत्त मुख्याध्यापिका शीतल काळे यांनी केले. आगाशे विद्यामंदिरात गुरुवर्य जोग स्मृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. Guruvarya Jog Memorial Day at Agashe Vidyamandir

या वेळी रोटरी क्लबचा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षिका ज्योत्स्ना सागवेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुख्याध्यापिका सौ. कदम यांना ज्ञानज्योती अॅवॉर्ड मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. सत्काराबद्दल सौ. सागवेकर यांनी सांगितले की, माजी विद्यार्थी कुठेही बाहेर भेटले की नमस्कार करतात हे भाग्य फक्त शिक्षकांनाच मिळते. आगाशे विद्यामंदिर ही कर्मभूमी पंढरी आहे. त्यामुळे रोटरीचा नेशन बिल्डर अॅवॉर्ड विद्यार्थ्यांना समर्पित करते. Guruvarya Jog Memorial Day at Agashe Vidyamandir

कार्यवाह वणजु म्हणाले की, शाळा उत्तुंग भरारी घेते तेव्हा तिच्या पाठिशी संस्था, शिक्षक व पालक यांची शक्ती असते. हा त्रिवेणी संगम जिथे होतो. त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र साकारते. पाठीवरची एक थाप यशाकडे घेऊन जाते. Guruvarya Jog Memorial Day at Agashe Vidyamandi

धैर्या गवाणकर हिने सुरेख गीत सादर केले. स्पृहा गोडबोले हिने स्वामी स्वरूपानंदांची वरप्रार्थना सादर केली. ट्रायथलन स्पर्धेची विजती मीरा भुरवणे हिलाही गौरवले. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आयोजित बालदिंडीत सहभागी विद्यार्थ्यांना आणि मार्गदर्शक शिक्षकांना गौरवण्यात आले. गुरुवर्य जोग स्मृतीदिनानिमित्त आयोजित पाढे पाठांतर व अन्य स्पर्धांमधील विद्यार्थ्यांना सन्मानित केले. सुधीर शिंदे आणि शिक्षिका सौ. देवरुखकर यांनी सूत्रसंचालन केले. गीता सावंत यांनी आभार मानले. Guruvarya Jog Memorial Day at Agashe Vidyamandir

या वेळी शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर, कार्यवाह दादा वणजू, कार्यकारिणी सदस्य दादा कदम, अनंत आगाशे, चंद्रकांत घवाळी, धनेश रायकर, मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, ज्येष्ठ शिक्षिका सौ. भारती खेडेकर, सौ. गीता सावंत, सौ. ज्योत्स्ना सागवेकर आदी उपस्थित होते. Guruvarya Jog Memorial Day at Agashe Vidyamandir
