गुहागर, ता. 21 : तालुक्यातील वेळंब शाळा नं 1 मधील क्षितिजा मोरे या विध्यार्थीनीची इस्रो अंतरिक्ष प्रक्षेपण केंद्र केरळसाठी निवड झाली आहे. तिच्या या निवडीमुळे शाळेच्या यशात मनाचा तुरा रोवला गेला आहे. तालुका स्तरावर झालेल्या इस्रो नासा निवड चाचणी परीक्षेत क्षितिजा शशिकांत मोरे हिने 69 गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला होता. Selection for ISRO Space Launch Centre
केंद्र, बिट स्तरावर व तालुका स्तरावर यश संपादन करून तीची जिल्हा स्तरावर निवड झाली होती. जिल्हा स्तरामध्ये देखील चांगली कामगिरी करून तिची इस्रो अंतरिक्ष प्रक्षेपण केंद्र केरळसाठी निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागात असूनही मोठे यश मिळवल्याने शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक समिती, बिट विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे. Selection for ISRO Space Launch Centre