उर्दु हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दि. ५, ६, ७, जानेवारी २०२३ रोजी
गुहागर, ता. 21 : राज्य विज्ञान शिक्षण संस्था, जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती गुहागर, शिक्षण विभागाने ५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन दि. ५, ६, ७, जानेवारी २०२३ रोजी शृंगारी उर्दु हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे संपन्न होणार आहे. Science Exhibition at Shringartali
विज्ञान प्रदर्शन या संदर्भातील तालुकास्तरीय सभा नुकतीच शृंगारी उर्दु हायस्कूलमध्ये संपन्न झाली. त्यावेळी गटशिक्षणाधिकारी लीना भागवत यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य संयोजन समितीची स्थापना करण्यात आली. त्याबरोबरच स्वागत समिती, उद्घाटन व समारोप समिती, नोंदणी व प्रदर्शन मांडणी, समिती, भोजन समिती, पार्किंग, वाहतूक समिती प्रथमोपचार समिती पाणी पुरवठा समिती रांगोळी समिती, विज्ञान दिंडी शोभायात्रा समिती, मुल्यमापन समिती, प्रसिद्धी समिती आदी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना काळानंतर हे विज्ञान प्रदर्शन होत असल्याने विद्यार्थी, शिक्षक, शाळा यांच्यामध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. Science Exhibition at Shringartali
शालेय विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणीव जागृतीसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा इयत्ता १ ते ५, इयत्ता ६ ते ८ व इयत्ता ९ ते १२ या तीन गटांत घेतल्या जाणार आहेत. त्यावेळी गटशिक्षणाधिकारी लीना भागवत शिक्षण विस्तार अधिकारी गणपत पांचाळ, शिक्षण विस्तार अधिकारी रायचंद गळवे, शृंगारी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव जहुर बोट, केंद्रीय प्रमुख अशोक गावणकर, नामदेव लोहकरे, सुभाष पवार, कैलास शार्दुल, सुनिल भांड, तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष बी.एन. गुटुकडे, तालुका गणित मंडळाचे गणेश कुलकर्णी, शृंगारी उर्दु हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शगुफ्ता सौराज, मुख्याध्यापक महावीर थरकार शेख, एम.ए.आर., सुदेश कदम, दिनेश जानवळकर, बाबासाहेब राशिनकर, दशरथ कदम, कलिम वणु, कृपाल परचुरे, गुहागर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक विज्ञान व गणित प्रेमी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Science Exhibition at Shringartali

