• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे ग्रामपंचायत मविआने जिंकली

by Guhagar News
December 20, 2022
in Politics
472 5
0
Guhagar Gram Panchayat Election

पाटपन्हाळे सरपंच पदाचे उमेदवार विजय तेलगडे विजयी झाल्यानंतर जल्लोष करताना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते

927
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आबलोली गावपॅनेलकडे, ठाकरे 8 तर भाजप पदरात 2 ग्रामपंचायती

गुहागर, ता. 20 :  तालुक्यातील सरपंच पदासाठी निवडणुक झालेल्या 12 ग्रामपंचायतींपैकी 8 ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाने वर्चस्व मिळवले आहे. सर्वात चर्चेत असलेलली पाटपन्हाळे ग्रामपंचायत महाविकास आघाडीने जिंकली. भाजपच्या ताब्यात 2 ग्रामपंचायती आल्या. तर 1 ग्रामपंचायत ग्रामविकास पॅनेलने जिंकली. राष्ट्रवादी काँग्रस आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षाना एकाही ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला नाही. या निकालांमुळे गुहागर तालुक्यावर आमदार भास्कर जाधव यांची मजुबत पकड असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. Guhagar Gram Panchayat Election

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

हेदवी, पांगारी तर्फे हवेली, धोपावे, वरवेली, खोडदे, झोंबडी, चिखली, आरे वाकी पिंपळवट या ग्रामपंचायतींचे सरपंच पदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार विजयी झाले. जानवळे आणि कौंढर काळसुर ग्रामपंचायतीमध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले. Guhagar Gram Panchayat Election

पाटपन्हाळेवर मविआचा झेंडा

गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वांत लक्षवेधी होती. येथे सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी मविआ, भाजप , बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे यांनी पुरस्कृत केलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अटीतटीच्या लढतीमध्ये महाविकास आघाडीच्या विजय तेलगडे (1251) यांनी विद्यमान संजय पवार (675) यांचा 576 मतांनी पराभव केला.  भाजप पुरस्कृत परिसर विकास पॅनेलचे महेश कोळवणकर तिसऱ्या क्रमांकावर राहीले. Guhagar Gram Panchayat Election

Guhagar Gram Panchayat Election
आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीमधुन निवडून आलेल्या 70 वर्षीय उमेदवार सुवर्णा भोसले.

विद्यमान सरपंचांना सर्वात कमी मते

धोपावे सरपंच पदाच्या निवडणुकीत विद्यमान सरपंच सदानंद पवार यांना संपूर्ण निवडणुकीतील सर्वात कमी मते (12) मिळाली. विशेष म्हणजे धोपावे गावातील एका प्रभागात सदानंद पवार यांना शुन्य (0) मते मिळाली. Guhagar Gram Panchayat Election

सचिन ओकनी तिसऱ्यांदा केली अनामत जप्त

वयाच्या 21 व्या वर्षी राजकारणात सक्रिय झालेल्या सचिन ओक यांना 2007 च्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत प्रभाग 1 मधून 22 मतांनी पराभव स्विकारावा लागला. मात्र त्यानंतर 2012 मध्ये प्रभाग 1 मधून 462 मताधिक्याने, 2017 मध्ये प्रभाग 2 मधून 260 मतांनी ते विजयी झाले. या दोन्ही वेळा त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले होते. 2022 च्या निवडणुकीत प्रभाग 1 मधून गाव पँनेलचे उमेदवार म्हणून सचिन ओक 337 (एकूण मते 420) मताधिक्याने विजयी झाले. रवींद्र शिगवण यांना केवळ 83 मते मिळाली. यावेळीही प्रतिस्पर्धी उमेदवाराची अनामत जप्त झाली आहे. त्यामुळे विजयाच्या हॅटट्रीकबरोबर सलग तिनवेळा प्रतिस्पर्धी उमेदवाराची अनामत जप्त करण्याचा विक्रमही सचिन ओक यांनी केला आहे. Guhagar Gram Panchayat Election

Guhagar Gram Panchayat Election
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी गुहागरमधील विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

भाजपने ठाकरे गटाला विजय बहाल केला

आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीमध्ये साईनाथ नारायण कळझुणकर (508) व विशेष धोंडू घडवले (400) हे दोघे भाजपचे कार्यकर्ते सरपंच पदाच्या रिंगणात होते. त्याचा फायदा ठाकरे गटाच्या समीत घाणेकर (519) यांना विजयासाठी झाला. आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग १ ना.मा.प्र. स्त्री गटात मायलेकी एकमेकांविरोधात निवडणूक लढवित होत्या. या लढतीत आई सुवर्णा दिनानाथ भोसले (282) यांनी  त्यांची मुलगी प्राजक्ता प्रसाद देवकर (232) हीचा 50 मतांनी पराभव केला. Guhagar Gram Panchayat Election

(गुहागर न्यूजने आरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील  मायलेकीत सामना रंगणार ही सर्वात वेगळी बातमी सर्वप्रथम दिली होती. आज निकालाच्या दिवशी सर्व माध्यमांचे लक्ष आज या लढतीकडे लागले होते. सुवर्णा दिनानाथ भोसले विजयी झाल्यावर सर्वच माध्यमांनी भोसले यांची मुलाखत घेतली. )

मायलेकींमध्ये रंगणार निवडणुकीचा सामना

आबलोली गाव पॅनेलकडे

आबलोली ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमीप्रमाणे बीनविरोध करण्याचा प्रयत्न गावाने केला होता. मात्र काही मंडळींनी गावाचा निर्णय न मानता उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे  गावपॅनेल म्हणून सर्वपक्षीय ग्रामस्थांनी निवडणूक लढवली व जिंकली. निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनीच हा विजय गाव पॅनेलचा असल्याचे जाहीर केले. Guhagar Gram Panchayat Election

Guhagar Gram Panchayat Election
मतमोजणी परिसरात ग्रामस्थांनी केलेली गर्दी

उच्चशिक्षित महिला सरपंच पदी

जानवळे गावाच्या सरपंच पदी निवडून आलेल्या सौ. जान्हवी शिरगावकर या उच्चशिक्षीत सरपंच आहेत. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर पदवी (एम.कॉम.) प्राप्त केली आहे.  निकालाच्या वेळी सर्वाधिक शिक्षण घेतलेल्या सरपंच म्हणून त्यांचे सर्वांनी कौतुक केले. जानवळेतील ग्रामस्थांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही मंडळींना गावाचा निर्णय मान्य नव्हता. अशा मंडळींनी माजी सैनिक सुनील जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली गावाच्या विरोधात उमेदवार दिले. मात्र सरपंच पदासह सर्वाधिक जागा भाजप पुरस्कृत गाव पॅनेलने जिंकत जानवळे ग्रामपंचायत ताब्यात घेतली. Guhagar Gram Panchayat Election

Tags: GuhagarGuhagar Gram Panchayat ElectionGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share371SendTweet232
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.