चिपळूणच्या तिघांसह रत्नागिरीतील चौघांचा समावेश ; सायकलवरून 600 किलोमीटर अंतर पार
गुहागर, ता. 19 : सुमारे साडेचार हजार मीटरचे इलेव्हेशन… बोचरी थंडी…वाऱ्याची उलट दिशा अन् 40 तासात पाटण ते हुबळी (कर्नाटक) रिटर्न असा तब्बल 600 किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करत रत्नागिरी, चिपळूण येथील सात अवलियांनी सायकलिंग क्षेत्रातील मानाचा सुपर रँडोनिअर्स हा किताब मिळवला आहे. चिपळूण येथील सह्याद्री रँडोनिअर्सच्या नावलौकिकात यामुळे भर पडली आहे. या सहाशे किलोमीटर बीआरएममध्ये आणखी तिघे सायकलिस्ट सहभागी झाले होते. ते सुद्धा लवकरच सुपर रँडोनिअर्स किताब मिळवण्याच्या मार्गावर आहेत. The cycle covered 600 kms
चिपळूण स्थित सह्याद्री रँडोनिअर्सचे मनोज भाटवडेकर आणि श्रीनिवास गोखले यांच्या पुढाकाराने शनिवार, 17 डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील पाटणपासून कर्नाटकातील हुबळीपर्यंत 600 किलोमीटरच्या सायकल बीआरएमचे आयोजन केले होते. या बीआरएममध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 10 सायकलिस्टनी भाग घेत सदर बीआरएम यशस्वीपणे पूर्ण केली. या 10 जणांपैकी 7 जणांनी याआधी सह्याद्री रँडोनिअर्सने आयोजित केलेल्या 200 किलोमीटर, 300 किलोमीटर आणि 400 किलोमीटर बीआरएम पूर्ण केलेल्या होत्या. त्यामुळे रविवारी सायंकाळी 600 किलोमीटरची बीआरएम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना सुपर रँडोनिअर हा किताब मिळाला आहे. सन 2022-23 च्या नवीन सिझनमधे चिपळूण तालुक्यातील डॉ. समुद्रविजय पाटील, अहमद शेख, योगेश ओसवाल तर रत्नागिरी तालुक्यातील अमित कवितके, त्रुणाल येरुणकर, डॉ. नितिन सनगर, ॲड.यतिन धुरत हे या सन्मानाला पात्र झाले आहेत. The cycle covered 600 kms

यावर्षीच्या सिझनमध्ये सह्याद्री रँडोनिअर्सने आपल्या पहिल्याच वर्षी तब्बल सात रँडोनिअर्स करुन एक भूषणास्पद कामगिरी केली आहे. त्यामुळे सह्याद्री रँडीनिअर्सवर तसेच सुपर रँडोनिअर्स झालेल्या रायडर्सवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सह्याद्री रँडीनिअर्सचे अजून काही रायडर्स येत्या काळात सुपर रँडोनिअर्स होण्याच्या मार्गावर आहेत. यात डॉ. तेजानंद गणपत्ये, संयम सोमण आणि रोहन पवार यांच्यासह अन्य काही रायडर्सचा समावेश आहे. तर काही रायडर्स सेकंड सिरीजमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवणार आहेत. The cycle covered 600 kms
सह्याद्री रँडोनिअर्स हा रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणून स्थापन झालेला ऑडाक्स इंडिया मान्यताप्राप्त क्लब आहे. लोकांना लांब पल्ल्याच्या सायकलिंगची आवड निर्माण व्हावी. तसेच रँडोनिअरींगची संस्कृती जोपासली जावी यासाठी अशा इव्हेंट्सचे जगभरात आयोजन केले जाते. भारतात असे मोजके शंभर क्लब असून त्यात सह्याद्री रँडोनिअर्सच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे. The cycle covered 600 kms

नोव्हेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत 200, 300, 400, आणि 600 किलोमीटर नेमून दिलेल्या वेळेत पूर्ण करणाऱ्या रायडरला सुपर रँडोनिअर असा किताब मिळतो. यापूर्वी चिपळूण तालुक्यातून स्वप्नील दाभोळकर, प्रसाद आलेकर, विक्रांत आलेकर, मनोज भाटवडेकर, श्रीनिवास गोखले, धनश्री गोखले, रोशन भुरण तर खेड तालुक्यातील शैलेश पेठे, दापोली तालुक्यातील मिलिंद खानविलकर, केतन पालवणकर यांनी सुपर रँडोनिअर्स हा किताब मिळवला आहे. The cycle covered 600 kms

