गुहागर शहरातील ४८ स्वयंसहाय्यता बचत गट मिळून हिरकणी संघ स्थापन
गुहागर, ता. 18 : दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रात ४८ स्वयंसहाय्यता बचत गट आहेत. या महिलांनी मिळून स्थापन केलेल्या हिरकणी शहरस्तर संघाचे गुहागर नगरपंचायतीच्या वतीने उदघाटन करण्यात आले. यावेळी बचत गटांनी उत्पादीत मालाच्या सादर केलेल्या प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बचत गटातील २०० महिला उपस्थित होत्या. Display of objects of self-help groups
गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांनी उत्पादीत केलेल्या विविध मालाबरोबर कलाकुसर, कौशल्य या वस्तुंचे प्रदर्शन व स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. यावेळी बचत गटांनी प्रदर्शनात मांडलेल्या वस्तु व खाद्य पदार्थाची पहाणी मान्यवरांनी करून बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन बचत गट आर्थिक दृष्टया सक्षम झाले पाहीजेत असे मत व्यक्त केले. तसेच वस्तु व खादय पदार्थांची खरेदीही यावेळी करण्यात आली. Display of objects of self-help groups

या प्रदर्शनात श्रेयस स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने कोकणी प्रोडक्ट, खाद्य पदार्थ, सर्व प्रकारचे पापड, तळलेले फणस गरे, रूची बचत गटाने खाद्यपदार्थ, लाडू, आम्रपाली बचत गटाने पौष्टीक लाडू, शेगदाणा लाडु, शहानुर बचत गटाने सुशोभित केलेली गोधडी ज्याची विक्री ही एक गोधडी १० हजार रूपयापर्यंत होते. माशाहल्लाह बचत गटाचे मसाले, पापड, गारमेंटस, कोकमदेवी बचत गटाच्या उश्या, मातीची भांडी, लोकराच्या वस्तु तर श्री नाम्या बचत गटाच्या कुळीथ पीठ व सर्व प्रकारचे पीठ या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. Display of objects of self-help groups

उपायुक्त रोहीदास दोरकुळकर यांनी हिरकणी शहरस्तर संघाला रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र वितरीत केले. तसेच मार्गदर्शन करताना बचत गटाचे काम उत्तम सुरू आहे. त्याचबरोबर त्यांना अजूनही प्रशिक्षण देऊन उत्तमरित्या काम करून आपल्या कुटुंबाला, संसाराला आर्थिक हातभार लावता येईल. यासाठी प्रयत्नशील असावे. मार्केटींग व्यवस्थेसाठी महाराष्ट्रपातळीवर वेबसाईट पोर्टल सुरू करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. Display of objects of self-help groups

यावेळी सहआयुक्त महेश चौधरी, अधिक्षक भुषण चिने, राज्य अभियान व्यवस्थापन रविंद्र जाधव, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, समुदाय संघटक सौ. सुचिता आंबोकर, शिक्षण समिती सभापती सौ. मनाली सांगळे, स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. स्नेहल रेवाळे, हिरकणी शहरस्तर संघाच्या अध्यक्षा सौ. रश्मी पालशेतकर, संघसचिव सौ. स्वाती कचरेकर, खजिनदार सौ. निधी सुर्वे, सौ. अवंती गमरे, दिक्षा माटल, सौ. विभा गमरे उपस्थित होत्या. Display of objects of self-help groups

