सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात
गुहागर, ता. 17 : गुहागर तालुक्यातील आर्थिक राजधानी व मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी जोरदार धुरळा उडू लागला आहे. या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणूकीसाठी ४ उमेदवार तर सदस्य पदासाठी १६ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी मातब्बर उमेदवारांमध्ये चौरंगी लढत रंगणार आहे. थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने सरपंच पदासाठी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या असलेल्या ५ प्रभागातील जनता सरपंच निवड करणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवार आपआपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत. Fighting for Patpanhale Gram Panchayat

पाटपन्हाळे या ग्रामपंचायतीच्या एकूण पाच प्रभागातून १३ सदस्य आहेत. यामध्ये प्रभाग १ पाटपन्हाळे, मतदार ६१८, सदस्य संख्या ३, प्रभाग २ कोंडवाडी मतदार ७३१, सदस्य संख्या ३, प्रभाग ३ बाजारपेठ, मतदार ७६२, सदस्य संख्या २ प्रभाग ४ रोशन मोहल्ला, मतदार ४४६, सदस्य संख्या २, प्रभाग ५ शृंगारी, मतदार ८४८, सदस्य संख्या ३ असे असून या ग्रामपंचायतीमध्ये ५ प्रभागात एकूण ३४०५ मतदार आहेत. १३ सदस्यांपैकी ६ सदस्य आधिच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ७ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच ४ उमेदवार सरपंच पदाच्या रिंगणात आहेत. Fighting for Patpanhale Gram Panchayat
यामध्ये पाटपन्हाळे ग्रामपंचायत परिसर विकास पॅनलचे श्री. विजय तेलगडे, श्री लक्ष्मी मानाई गाव विकास पॅनलचे विद्यमान सरपंच श्री. संजय पवार, गाव विकास परिवर्तन पॅनलचे श्री. महेश कोळवणकर तर मनसे पृरस्कृत प्रसाद कुष्टे सरपंच पदाच्या रिंगणात आहेत. सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली असून मतदार राजा कोणाला कौल देतो हे आगामी २० डिसेंबरला स्पष्ट होणार आहे. Fighting for Patpanhale Gram Panchayat
पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये ५ प्रभाग असून १३ सदस्य हे ग्रामपंचायतीची धुरा संभाळत आहेत. या गावाचा विस्तार लक्षात घेता सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य पदासाठीही सर्वच प्रभागामध्ये अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. आर्थिक राजधानीत होणाऱ्या सर्व घडामोडीचा प्रभाव तालुक्यावर पडत असतो. सरपंचपदासाठी मतदार राजा कोणाला सिंहासनावर बसवते हे पाहणे औस्त्युक्याचे ठरणार आहे. Fighting for Patpanhale Gram Panchayat
