गुहागर, ता.16 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व रत्नागिरी जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत जिल्हास्तरीय सायकलिंग शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दापोलीतील ७ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. या स्पर्धा सावर्डे चिपळूण येथे ११ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आल्या होत्या. 7 students of Dapoli in cycling competition
या रत्नागिरी जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत एकोणीस वर्ष मुलगे वयोगटामध्ये ए जी हायस्कूल दापोलीचे यश शिर्के आणि सर्वेश बागकर यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. सतरा वर्ष मुलगे वयोगटामध्ये एन के वराडकर कॉलेज दापोली चा हर्ष लिंगावले याने प्रथम क्रमांक मिळवला. सतरा वर्ष मुली वयोगटामध्ये ए जी हायस्कूल दापोलीच्या संचिता भाटकर हिने प्रथम क्रमांक मिळवला. चौदा वर्ष मुलगे वयोगटामध्ये न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे चा श्री मिलिंद खानविलकर याने प्रथम व सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणी चा साईप्रसाद वराडकर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. चौदा वर्ष मुली वयोगटामध्ये ज्ञानदीप विद्यामंदिर दापोली ची स्नेहा भाटकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. दापोलीतील या सात विद्यार्थ्यांची निवड विभागस्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे. 7 students of Dapoli in cycling competition

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, पालक आणि दापोली सायकलिंग क्लब यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सायकलिंग स्पर्धेत पहिल्यांदाच दापोलीहून ७ विद्यार्थी विभागस्तरासाठी निवडले गेले आहेत. दापोलीचे आणि आपापल्या शाळेचे नाव उंचावल्याबद्दल या सर्वांचे कौतुक होत आहे. 7 students of Dapoli in cycling competition


