गुहागर, ता. 15 : समर्थ भंडारी पतसंस्थेचे (Samarth Bhandari Credit Institutions) अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय पारदर्शक पध्दतीने कामकाज चालु असलेल्या संस्थेच्या मुख्यालयास सोमवारी चिपळूण अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संतोष देसाई यांनी संस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर व चिपळूण अर्बन बँकेचे अधिकारी श्री. समीर जंगम उपस्थित होते. Goodwill Gift to Samarth Bhandari Credit Union
श्री. आरेकर यांनी सन 2002 साली या संस्थेची स्थापना केली व अल्प कालावधीतच म्हणजेच 27 नोव्हेंबर 2022 अखेर या संस्थेच्या 17 शाखा विस्तार झाला. तसेच वसुल भागभांडवल 7.12 कोटी, ठेवी 127 कोटी, कर्ज व्यवहार 103 कोटी तर निव्वळ नफा 3.35 कोटी असुन सभासदांना 14 टक्के दराने लाभांश दिला आहे. Goodwill Gift to Samarth Bhandari Credit Union
नुकतीच समर्थ भंडारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची नेरूळ मुंबई येथे शाखा झाली आहे. चिपळूण मधुन संस्थेच्या कामकाजास सुरूवात करून मुंबई पर्यंत शाखा विस्तार करून कार्यक्षमपणे संस्था चालवणे ही निश्चीतच अभिमानास्पद बाब आहे. तसेच सकाळ समूहाने सहकारात उल्लेखनीय कामकाज केलेल्याबद्दल आदर्श चेअरमन अवॉर्ड देऊन गौरव केला आहे. पतसंस्थेच्या कामकाजाचे चिपळूण अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संतोष देसाई व चिपळूण अर्बन बँकेचे अधिकारी श्री. समीर जंगम यांनी श्री. प्रभाकर आरेकर यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Goodwill Gift to Samarth Bhandari Credit Union

