• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ऑफ्रोह’ चे जिल्हाधिकारी यांना निवेदन

by Ganesh Dhanawade
December 15, 2022
in Bharat
105 1
0
Afroh's statement to the Collector

प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना

207
SHARES
590
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अनुसूचित जमातीमध्ये तेढ निर्माण करणा-यांवर कायदेशीर कारवाई करा

गुहागर, ता.15 : अनुसूचित जमातीमध्ये तेढ निर्माण करणा-या व्यक्ती व संस्थेवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (Organization for Rights of Human) शाखा रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. Afroh’s  statement to the Collector

जिल्हाधिकारी यांच्या वतीने नायब तहसिलदार संजय खेडस्कर यांनी ऑफ्रोहचे (Afroh) निवेदन स्वीकारले. गेले तीन वर्ष आधिसंख्य व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित होते. शेवटी गेल्या मंत्रीमंडळ बैठकीत अधिसंख्य व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देण्याबाबत शिंदे – फडणवीस सरकारने सकारात्मक निर्णय घेतला. मात्र कायम पोटशूळ असलेल्या १२ आदिवासी जमातीच्या नेत्यांनी, व संघटनांनी शासनाचा निषेध करणे सुरू केले. व आमच्या विशिष्ट जमातीला ‘बोगस’ व ‘जातचोर’ म्हणून अनुसूचित जमातीच्या मध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे अशा व्यक्ती व संस्थेवर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणीही निवेदनातून करण्यात आली. Afroh’s  statement to the Collector

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

विस्तारित क्षेत्रातील ३३ जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर निवडून आलेल्या १४ बोगस आदिवासी आमदार व २ बोगस आदिवासी खासदार यांना हटवा. निवृत्त न्यायाधीश गायकवाड समितीच्या अहवालानुसार आदिवासी विकास विभागात ६ हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाका. Afroh’s  statement to the Collector

आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष आ. सूरेश धस यांचा आदिवासी विकास विभागात दाबून ठेवलेला अहवाल तात्काळ उघड करा. आदिवासी विकास विभागात केलेल्या ६००० कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाका. अनुसूचित जमातीच्या जातप्रमाणपत्र तपासणी समितीने ‘प्रधान’ यांना ‘परधान’, ‘आंध’ यांना ‘अंध’, ‘बुरूड’ यांना ‘गोंड’ जमातीचे दिलेले बोगस वैधता प्रमाणपत्र रद्द करा व या तपासणी समिती व अधिका-यांची असून चौकशी करा, खुल्या प्रवर्गाच्या असूनही अनुसूचित जमातीच्या जागेवर लागलेल्या सौ. स्वप्नल जोपळे यांना बडतर्फ करा, अशी मागणीही निवेदनातून केली आहे. Afroh’s  statement to the Collector

यावेळी ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र पौनीकर यांच्यासह महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सुनंदा फुकट, सहसचिव स्वाती रोडे, सुरेखा घावट, बळीराम भगत आदी कर्मचारी उपस्थित होते. Afroh’s  statement to the Collector

Tags: AfrohGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOrganization for Rights of HumanUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share83SendTweet52
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.