दुर्गम भागातील पाहिले व्यावसायिक एमडीआरटी
गुहागर, ता.12 : तालुक्यातील भातगाव येथील मेहनती भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) प्रतिनिधी धीरज भागा मुंडेकर यांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील पाहिले एमडीआरटी पुरस्कार प्राप्त केला आहे. तसेच 2023 मध्ये अमेरिकेत होणाऱ्या एमडीआरटी कॉन्स्फरन्ससाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. MDRT Award to Dheeraj Mundekar
विमा प्रतिनिधी धीरज मुंडेकर भातगाव सारख्या दुर्गम भागात उत्तम आयुर्विमा सेवा देण्याचे काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या मेहनतीने पहिला एमडीआरटी पुरस्कार प्राप्त केला आहे. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सर्व विमा ग्राहकांनी दिलेल्या उदंड सहकार्यामुळे आज मी माझे आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त करणारे व्यावसायिक एमडीआरटी पूर्ण करू शकलो. माझे विकास अधिकारी शशिधर कान्हेरे, चिपळूण शाखेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच माझा प्रिय विमेदार आणि माझा हितचिंतक मित्र परिवार यांच्या मुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो, असे मुंडेकर यांनी सांगितले. MDRT Award to Dheeraj Mundekar

