सामाजिक भान असलेलं प्रभावशाली व्यक्तिमत्व: शशिकला वराळे
गुहागर, ता.12 : गेली 27 वर्ष पतीच्या पश्चात कुटुंबाची जबाबदारी सांभाळत वयाच्या 64 व्या वर्षी इगतपुरी येथे धम्म शिबीर पूर्ण केले. भारतीय बौध्दमहासभा या संस्थेच्यावतीने घेण्यात आलेली केंद्रीय शिक्षिका परीक्षा उत्तीर्ण होऊ धम्मयान या मासिकात लेख लिहुन, धम्माचा प्रसार करणाऱ्या शशिकला हिंदुराव वराळे यांच वयाच्या 76 व्या वर्षी विक्रोळी मुंबई येथे निधन झालं. Sasikala Varale No More
रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत प्रतिभा वराळे यांचं नाव आदराने घेतले जाते. गुहागर येथे तहसीलदार प्रतिभा वराळे या प्रभावशाली काम करत आहेत. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या बुद्धिचातुर्यावर एखादं पद मिळत असतं. मात्र, त्या पदाचा प्रभाव समाजावर पडतो तेव्हा त्याच्यावर कुटुंबातून झालेल्या संस्काराची प्रचिती येथे! प्रतिभा वराळे यांच्यावर त्यांचे वडील ऍड. हिंदुराव आणि आई कालकतिथ शशिकला वराळे यांचे संस्कार झाले. प्रतिभा वराळे यांच्या सह त्यांची भावंड हितेंद्र वराळे, आश्विनी अविनाश कोतेकर, वंदना दीपक कुशवाहा, आकांशा अविनाश आढाव, प्रतिभा वराळे ऊर्फ प्रतिभा विद्याधर पंडित, सिद्धार्थ वराळे यांना उच्यशिक्षित करून समाजात आदर्श निर्माण केला. Sasikala Varale No More
कालकतिथ शशिकला हिंदुराव वराळे यांचं मूळ नाव शशिकला विष्णुपंत शेडगे ! यांचा जन्म कोल्हापूर येथील हेरले येथे 19 ऑकटोबर 1946 झाला. वडील विष्णुपंत शेडगे महसूल विभागात तलाठी म्हणून नोकरीला होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रगत विचाराचा पगडा ! समाज संक्रमणातून जात असताना 1960 साली मुलींना उच्य शिक्षित करूनच त्यांची लग्न कार्य करावी असा निर्णय त्यांनी घेतला. त्याकाळी मुलींची लग्न साधारणपणे 16 व्या वर्षी केली जात होती. परंतू, आपल्या मुलीला शिकवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना समाजातून विरोध झाला. परंतू, विष्णुपंत कडक शिस्तीचे असल्यामुळे ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यांनी त्यांना शिक्षणासाठी कायम प्रोत्साहित केलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण हेरले येथे तर माध्यमिक शिक्षण मलकापूर आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथील गोखले महाविद्यालय येथे पूर्ण झाले. शालेय आणि महाविद्यालयीन काळात अत्यंत हुशार विद्यार्थिनी असलेल्या शशिकला यांचे इंग्रजी आणि लॉजिक विषय आवडीचे होते. त्याकाळात त्यांनी एन.सी. सीचे प्रशिक्षण पूर्ण केले होते.त्यांचे बंधू दयानंद शेडगे ही उच्य शिक्षण घेऊन विक्रीकर विभागात अधिकारी म्हणून रुजू झाले. ते 2016 साली उपायुक्त पदावरून कोल्हापूर येथे निवृत्त झाले. यावरून त्यांच्या परिवारात शैक्षणिक संपन्नता किती होती हे लक्षात येईल. दरम्यान, गोखले कॉलेज मध्येच शिक्षण घेणारे हुशार विध्यार्थी असलेल्या हिंदुराव वराळे यांच्याशी वयाच्या 22 व्या वर्षी त्यांचा विवाह 1968 साली झाला. हिंदुराव वराळे व्यवसायाने वकील असल्याने ते 1969 साली मुंबईत स्थायिक झाले. त्यांना सहा अपत्य झाली. या जोडप्याने उच्यशिक्षणाचा वारसा जपत आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देत उच्यशिक्षित केले. आपल्या मुलांना शिक्षणा बरोबर सामाजिक संस्कार केले. Sasikala Varale No More
ऍड.हिंदुराव वराळे यांचं 1996 मध्ये अल्पशा आजाराने निधन झालं. कुटुंबावर आलेला संकटाला न डगमगता शशिकला वराळे यांनी कुटुंबिक जबादारी सांभाळली. मोठा मुलगा हितेंद्र यांनी वडिलांच्या वकिली व्यवसाय करण्याचं ठरवलं. पुढे त्यांनी दिवाणी न्यायधीश परीक्षा उत्तीर्ण होऊन न्यायपालिका सेवेत प्रवेश केला. दिवाणी कनिष्ठस्तर न्यायधीश म्हणून कार्यरत असताना त्यांचं अल्पशा आजाराने 2011 मध्ये निधन झालं. तर त्यांच्या कन्या आश्विनी कोतेकर वकील व्यवसायात उतरल्या. सध्या त्या आढीया विधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. वंदना कुशवाह शालेय शिक्षिका आहेत. आकांशा आढाव या व्यवसायाने डॉक्टर आहेत. प्रतिभा वराळे या प्रशासकीय सेवेत असून सध्या त्या गुहागर तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. तर सिद्धार्थ वराळे पदवीधर असून उधोगजक म्हणून समाजात कार्यरत आहेत. कालकथित शशिकला वराळे यांनी आपले पती हिंदुराव यांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळत मुलांचे शिक्षण, त्यांची लग्न कार्य आणि नातवांचं संगोपन आदी जबाबदारी यशस्वी सांभाळून एक आदर्श माता म्हणून समाजात आदर्श निर्माण केला. कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका निभावताना सासरची आणि माहेरची मानसं जपत माणुसकी हिच आपली संपत्ती आहे. याची शिकवण आपल्या मुलांना दिली. Sasikala Varale No More
कुटुंबाची जबाबदारी पार पडल्या नंतर सामाजिक कार्याची जाणीव ठेवून शशिकला वराळे यांनी धम्माच्या वाटचालीने सुरुवात केली. वयाच्या 64 व्या वर्षी इगतपुरी येथील धम्मगिरी येथे जाऊन 10 दिवसाचे निवासी शिबीर पूर्ण केले. त्या नंतर 2009 साली सारनाथ, कुशीनगर, बोधगया, वैशाली, डुंगेशवरी, नेपाळ लिम्बुनी येथील स्थळांची धार्मिक सहल पूर्ण केली. त्या नंतर 2010 मध्ये भारतीय बौध्द महासभा या संस्थेच्या वतीने दादर चैत्यभूमी या पवित्रस्तूपा मध्ये आयोजित केलेल्या 10 दिवसाचं निवासी शिबीर यशस्वी पूर्ण केलं. शिबिरांती घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षिका परीक्षा उत्तीर्ण झाल्या. धम्माच्या प्रसारा करिता प्रकाशित होतं असलेल्या धम्मयान या मासिकात लेख लिहुन धम्माचा प्रसार केला. त्याच्या सोबत अनेक ठिकाणी शिबिरे आयोजित करून व्याख्याने दिली. अशा या तपस्वी, प्रेमळ, दयाळू, उपासिका सामाजिक भान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेल्या कालकथित शशिकला वराळे यांचं वयाच्या 76 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनाने वराळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. Sasikala Varale No More

