• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अर्ध्या किंमतीत बियाणे, हमी भावात शेतमाल

by Mayuresh Patnakar
November 5, 2022
in Guhagar
18 0
1
Buy seeds and give product at guaranteed price

गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीत उपलब्ध असलेले बियाणे

36
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीचा उपक्रम

गुहागर, ता. 05 : Buy seeds and give product at guaranteed price कंपनीकडून बियाणे अर्ध्या किंमतीत विकत घ्यायचे आणि त्यातुन मिळणारे उत्पादन हमी भावात याच कंपनीला विकायचे. अशी अनोखी योजना गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीने (Guhagar Organic Producers Company) आणली आहे. सध्या ही योजना कंपनीच्या सभासदांपुरती मर्यादित आहे. अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मंदार जोशी यांनी दिली.

या योजनेची माहिती देताना जोशी म्हणाले की, भात कापणी नंतर शेतात असलेला ओलावा आणि थंडीत पडणारे दव यावर अनेक शेतकरी (Farmer) दुबार शेती करतात. मात्र उत्पादित कडधान्य (Pulses) कुठे विकायचे असा त्यांच्यासमोर प्रश्र्न असतो. उत्पादित कडधान्याच्या विक्रीची हमी मिळाली तर दुबार शेतीचे प्रमाण वाढेल. असा विचार करुन आम्ही आमच्या सभासदांकरीता अर्ध्या किंमतीत बियाणे घ्या, हमी भावात शेतमाल द्या (Buy seeds and give product at guaranteed price) ही अनोखी योजना आणली आहे.

गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीने कोकण सदाबहार चवळी, कोकण वाल म्हणजेच कडवा वाल आणि दापोली 1 जातीचे कुळीथ या तीन कडधान्यांचे बियाणे सभासदांसाठी उपलब्ध केले आहे.  उत्पादक कंपनीच्या सभासदांना हे बियाणे निम्म्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. यापैकी कोणत्याही कडधान्याची लागवड केल्यानंतर येणारे सर्व उत्पादन (Proudct) विकण्यासाठी (Marketing) ग्राहक (purchaser)  शोधण्याची गरज सभासद शेतकऱ्यांना पडणार नाही. आधी हमीभाव जाहीर करुन मग आमच्या सभासद शेतकऱ्यांकडून सर्व उत्पादन विकत घेण्याची व्यवस्था कंपनीने केली आहे. शेतमालच्या विक्रीची हमी असल्याने शेतकरी अधिकाधिक उत्पादन घेऊ शकतील. Buy seeds and give product at guaranteed price

या योजनेची माहिती गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीच्या सर्वच्या सर्व 310 शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम सध्या सर्व संचालक करत आहेत. पहिलाच प्रयोग असल्याने सध्या तरी ही योजना आम्ही कंपनीच्या सभासदांपुरती मर्यादित ठेवली आहे. ज्या सभासदांना योजनेची अधिक माहिती हवी आहे त्यांनी गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीच्या (Guhagar Organic Producers Company)  शृंगारतळी पोस्ट ऑफिस समोर असलेल्या कार्यालयाला भेट द्यावी. किंवा 9523717982 / 8999275465 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन यावेळी मंदार जोशी यांनी केले. Buy seeds and give product at guaranteed price 

Buy seeds and give product at guaranteed price
Tags: Buy seeds and give product at guaranteed priceFarmerGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiGuhagar Organic Producers CompanyLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPulsespurchaserUpdates of Guhagarकडधान्यखरेदीदारगुहागर मराठी बातम्यागुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजशेतकरी
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.