गुहागर वरचापाट येथे 6 ते 10 नोव्हेंबर उत्सव
गुहागर, ता. 04 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात 6 नोव्हेंबर पासून कार्तिकोत्सवाला सुरवात होत आहे. या उत्सवामध्ये नर्मदा परिक्रमा या विषयावर प्रवचन आणि जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा आनंद लुटावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर यांनी केले आहे. Musical Theater Entry Competition

गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात 6 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामध्ये परंपरने होणारे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच 6 नोव्हेंबरला रात्री 9.30 वा. ह.भ.प. सुमंतबुवा भिडे यांचे किर्तन होणार आहे. 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर असे तिन दिवस सायं. 5 ते 6 काका महाराज वाड यांचे नर्मदा परिक्रमा या विषयाची माहिती देणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 9 व 10 नोव्हेंबरला स्व. गोविंदराव पटवर्धन स्मृतीप्रित्यर्क्ष जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने संगीत नाट्यरसिकांना विविध नाट्यगीतांचे सादरीकरण पहाण्याची संधी मिळणार आहे. तरी सर्वांनी कार्तिकोत्सवामधील व्याख्यान आणि संगीत नाट्यप्रवेश स्पर्धांना उपस्थित राहावे. असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर यांनी केले आहे. Musical Theater Entry Competition

