फॅमिलीला क्वालिटी टाईम (Quality Time) कसा द्यायचा?
श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900/ 9930653355
मित्रांनो, काल आपण बघितलं की फॅमिली साठी वेळ देणे किती आवश्यक आहे ते. आपण फॅमिलीला वेळ दिला, परंतु आपला मुख्य हेतू जर साध्य झाला नाही तर काय उपयोग?
फॅमिलीला कॉलिटी टाईम देण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला मी आज देणार आहे. एकमेकांना लक्षपूर्वक ऐका.. You should be a good listener
बऱ्याच वेळेला तुमची पत्नी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते.. उदाहरणार्थ तिची पाठ दुखत असते.. तीने असे बोलल्या बरोबर तुम्ही तिला सल्ला देता की “Iodex लाव व थोडा आराम कर”. मित्रांनो, जरा समजून घ्या, तिला सल्ला नको आहे. तिला उपाय माहिती आहे. तिला तुम्ही वेळ द्यावा.. ती करत असलेल्या कामाचं कौतुक करावं.. तिला प्रेम मिळावं ही तिची अपेक्षा असते… एखाद्या वेळी “मी एखादं काम करतो, तू आराम कर. Iodex तू लाव असं म्हणण्यापेक्षा, मी लावतो” असं म्हणावं अशी तिची अपेक्षा असते. आणि अशा पद्धतीने दिलेला वेळ हा क्वालिटी टाईम असेल
तुमचे आई वडील तुम्हाला म्हणाले की “टीव्ही बघून मला कंटाळा आलेला आहे”.. अशावेळी लगेच तुम्ही त्यांना उत्तर देता की “जरा बाहेर जाऊन फिरून या.. नवीन मित्र बनवा.. सारखं काय टीव्ही बघायचा? बाहेर बघा, तुमच्यापेक्षा वयस्कर लोक छान गप्पा मारत असतात”. मित्रांनो त्यांना तुमचा सल्ला नको आहे. तुम्ही जे सांगताय ते त्यांना अगोदरच माहित आहे. परंतु त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही त्यांना बाहेर घेऊन जावं, कधीतरी गार्डनमध्ये जाऊन त्यांच्याशी लहान मुलासारखं खेळावं.. ते नको म्हणत असताना देखील प्रेमाने कधीतरी त्यांना पाणीपुरी खायला घालावी.. तुम्ही त्यांच्यासोबत असावं आणि प्रेमाने चार गोष्टी बोलाव्यात ही त्यांची अपेक्षा असते..
आपण त्यांना पथ्य सांभाळा, हे करू नका, ते करू नका असा सल्ला देत असतो.. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होत नाही. तुम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद द्या, त्यांना समजून घ्या, हाच क्वालिटी टाईम असतो मित्रांनो
तुमच्या मुलांशी बोलताना तुम्ही कसे बोलता आणि काय बोलता हे पण खूप महत्त्वाचे असते. तुम्ही कामावरून घरी गेल्यावर तुमचा मुलगा किंवा मुलगी मोबाईल घेते आणि काहीतरी खेळायला लागते. लगेच तुम्ही बोलत असता की “बघ घेतला मोबाईल, बघेल तेव्हा सतत मोबाईलवर खेळत असते”.
मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही घरी येता, त्याच वेळी त्या मुलाला/ मुलीला मोबाईल मिळत असतो. मग तुम्ही आल्यानंतरच ती मोबाईल घेणार ना? तुमच्या माघारी त्यांना मोबाईल कोण देणार आहे? जरा समजून घ्या.. त्यांनी मोबाईल खेळायला नको असं वाटत असेल तर तुम्ही फ्रेश झाल्यावर त्यांच्याशी छान गप्पा मारा. दिवसभरातील एखादी विनोदी घटना सांगा. त्यांना हसवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वेळ असेल तर त्यांना घेऊन गार्डनमध्ये जा. त्यांना जवळ घ्या, त्याच्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवा. मित्रांनो त्यांना तुमचा स्पर्श हवा असतो.. हाच क्वालिटी टाईम असतो
बऱ्याच वेळा दुपारच्या जेवणाला तुम्ही सर्व एकत्र नसता. रात्री जेवण एकत्र करा. जेवताना तुमचा मोबाईल तुमच्या पासून लांब ठेवा. मोबाईलवर कोणाचाही कॉल आल्यास, कॉल घेऊ नका. जेवताना फक्त आपणच एकत्र असणार, हा मोबाईल आम्हाला डिस्टर्ब करू शकणार नाही, अशी खात्री तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मुलांना द्या
मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी करायला सुरुवात करा. तुमचे तुमच्या फॅमिलीसोबत नातेसंबंध खूप स्ट्रॉंग होतील व याचा छान परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनावर झालेला पाहायला मिळेल
गणपती बाप्पा तुमच्या घरी येतात, नवरात्री, दसरा, दिवाळी येईल.. अशा सणांचा फायदा घ्या, तुमच्या फॅमिलीला क्वालिटी टाईम द्या
So have a Quality Time with your family
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
(भाग -20 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद,
तुम्हाला खूप खूप प्रेम व शुभेच्छा
