• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दगडांच्या वहातुकीमुळे ग्रामस्थ हैराण

by Mayuresh Patnakar
November 4, 2022
in Guhagar
21 0
0
Villagers are shocked by the transportation
41
SHARES
117
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सुरुंगामुळे घरांना तडे ; रस्त्याचीही दुरावस्था

गुहागर, ता. 03 :  पाटपन्हाळे शृंगारतळी रस्त्यावरुन होणाऱ्या दगडाच्या वहातुकीमुळे वहातुकदार आणि ग्रामस्थ हैराण झालेत. तसेच डम्परच्या वहातुकीमुळे वरवेली गावातून मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ताही बाद झाला.  हे दगड काढण्यासाठी लावण्यात येणाऱ्या सुरुंगांमुळे मळण पाचाडवाडीतील अनेक घरांना तडे गेलेत. यामुळे शासकीय परवानग्या घेवून चालणारे खोदकामाबाबत प्रश्र्नचिन्ह निर्माण झाले आहे. Villagers are shocked by the transportation

गुहागर तालुक्यातील अंजनवेल परिसरात एलएनजी जेटीला संरक्षण करणाऱ्या भिंतीचे काम समुद्रात सुरु आहे. हे काम एल अँड टी कंपनी करत आहे. या कामासाठी विशिष्ट वजनाचे काळोत्री दगड समुद्राच्या तळाशी भराव म्हणून घालण्यात येतात. या दगडांचा पुरवठा करण्याचे काम एल अँड टी कंपनीने अन्य ठेकेदाराला दिले आहे. Villagers are shocked by the transportation

सदर ठेकेदाराने गुहागर तालुक्यातील वरवेली गावाच्या हद्दीत पाटपन्हाळे व मळण गावानजीक दिपक पवार यांच्या स्टोन क्रशर असलेली जागा कराराने घेतली. त्याठिकाणी खोदकामाला सुरुवात केली. दगड काढण्यासाठी लावण्यात येणाऱ्या सुरुंगामुळे मळण पाचाडवाडीतील अनेक घरांना तडे गेले. त्याची पहाणी शासनाने केली. ठेकेदाराने भरपाई देण्याचे कबुल केले. मात्र अद्याप दिलेले आश्र्वासन ठेकेदाराने पाळलेले नाही. खाणीतील दगडांची वहातुक डम्परद्वारे सुरु झाली. या अवजड वहातुकीमुळे वरवेलीतून मोडकाआगर येथे येणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरुन दुचाकी चालवणेही अवघड होवून बसले आहे. हा रस्ता दुरुस्त करुन द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. मात्र त्याकडे ठेकेदार दुर्लक्ष करत आहे. Villagers are shocked by the transportation

डम्परच्या वहातुकीमुळे खाणकाम परिसरातील चिखल गुहागर चिपळूण रस्त्यावर येत आहे. दिवाळीपुर्वी ही माती इतकी होती की पावसाचा शिडकाव झाल्यावर रस्ता निसरडा होत असे. आता पाऊस नसल्याने ही माती दुचाकीस्वारांच्या डोळ्यात जाते. याबाबत अमरदिप परचुरे, दिनेश चव्हाण आदी कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या. त्यानंतर ठेकेदाराची माणसे रोज सकाळी रस्ता झाडू लागली. Villagers are shocked by the transportation

या सर्व घटनांमुळे प्रशासनाची रॉयल्टी भरल्यानंतर सर्व नियम आणि अटींना हरताळ फासुन ठेकेदार मनमानी करत असल्याचे समोर येते. ठेकेदार कंपन्यांचे मालक किंवा जबाबदार अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नसतात. कामावर असलेले पर्यवेक्षक आणि कामगार वेळ मारुन नेतात. प्रशासन कागदोपत्री कारवाई झाल्यानंतर जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. हाल मात्र ग्रामस्थांचे होतात. त्यामुळे अशा ठेकेदारांवर अंकुश कोणी ठेवायचा असा प्रश्र्न निर्माण झाला आहे. पवारसाखरीमध्येही अशाच प्रकारचे खोदकाम सुरु होते. या ठेकेदारानेही पवारसाखरीतील ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली. शासनाच्या नियम आणि अटी धाब्यावर बसविल्या आहेत. मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. Villagers are shocked by the transportation

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVillagers are shocked by the transportationगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.